आरक्षित जागांचा विकास कधी?

पिंपरी – प्रभाग क्रमांक चौदामधील आरक्षित जागा ताब्यात घेवून त्या त्वरीत विकसित करण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.

शिवसेना नगरसेविका मीनल यादव यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना याबाबत निवेदन दिले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चौदामधील मोहननगर, काळभोरनगर परिसरामध्ये महापालिकेच्या अनेक जागा आरक्षित आहेत. त्यातील काही जागा महापालिकेच्या ताब्यात आहेत, तर काही जागा अजुनही ताब्यात घेण्यात आलेल्या नाहीत. त्यामध्ये गर्भनिदान रुग्णालय, खेळाचे मैदान, भाजी मंडई, उद्याने अशा अनेक आरक्षणांचा समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या सर्व आरक्षित जागांचे त्वरीत भूसंपादन करून त्या महापालिकेच्या ताब्यात घेणे गरजेचे आहे, तसेच त्यावरील आरक्षणे विकसित करणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिकांना त्या आरक्षित जागेवरील सुविधांचा लाभ होणार आहे. म्हणूनच प्रभाग क्रमांक चौदामधील आरक्षित जागा ताब्यात घेवून त्या त्वरीत विकसित करण्यात याव्यात, अशी मागणी नगरसेविका मीनल यादव यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)