आरक्षण मंजूर होताच म्हसवडला मराठा बांधवांचा जल्लोष

म्हसवड, दि. 29 (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण एकमताने मंजूर केल्याबद्दल सर्वपक्षीय मराठा समाजाने मोठा जल्लोष करून म्हसवड येथे जल्लोष व्यक्त केला.
मुंबई येथील राज्य अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा ठराव मांडला. त्यास कॉंग्रेस, राष्ट्रवादी, रासप, शेकापसह सर्व राजकीय पक्षांनी एकमुखाने पाठींबा दिला. मराठा आरक्षण एकमताने मंजूर होताच म्हसवड येथील सर्व मराठा बांधव एकत्र आले. बसस्थानक व प्रमुख चौकात फटाके वाजवून, साखर वाटून मोठ्या जल्लोषात घोषणा देऊन सर्वांनी आनंद व्यक्त केला. या निमित्ताने सर्वांनी सिद्धनाथाचे दर्शन घेतले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. श्रीमंत बाळासाहेब राजेमाने, जय राजेमाने, प्रा. विश्वंभर बाबर, बाबासाहेब माने, आकाश माने, महादेव माने, डॉ. जयराज पवार, सुरेश काटकर, बापूसाहेब बाबर यांच्यासह सर्व पक्षातील मान्यवर, मराठा बांधव उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)