आरक्षण बंद करा, नाहीतर आम्हाला फासावर लटकवा

सवर्ण समाज रॅली
भोपाळ (मध्य प्रदेश) – आरक्षण प्रक्रिया बंद व्हावी यासाठी सवर्ण समाजाने डबरा येथे एक रॅली काढली होती. सवर्णांनी अर्धनग्न होऊन या रॅलीत सहभाग घेतला होता. रविवारी सकाळी शहरभर रॅलीज काढून धरणे आंदोलनही करण्यात आले..
एक तर आरक्षण बंद करा, नाही तर आम्हा लोकांचा जगण्याचा अधिकार काढून घ्या; आम्हाला फासावर लटकवा, असे या रॅलीमध्ये युवा नेता आदित्य राजौरिया यांनी सांगितले.

अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अत्याचार निवारक कायद्यातील दुरुस्तीविरोधात रविवारी सवर्ण समाजाने या रॅलीचे आयोजन केले होते. रॅलीत सहभागी लोकांनी अर्धनग्न होऊन सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ही दुरुस्ती मागे घ्यावी. न घेतल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल, आणि त्याची जबाबदारी सरकारवर राहील, असा इशारा रॅलीनंतर देण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)