आरक्षण टिकवण्यासाठी वकिलांची फौज उभी करणार : चंद्रकांत पाटील

न्यायालयीन लढाईसाठी सरकारची जय्यत तयारी

आरक्षण विरोधकांना झोंबलेय – विनोद तावडे
मराठा आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका हा विरोधकांचा डाव असल्याचा आरोप शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला. ते म्हणाले, शिवसेना-भाजपने मराठ्यांना आरक्षण दिलेय हे विरोधकांना झोंबले आहे. आरक्षणाला विरोध करणाऱ्यांमध्ये विरोधी पक्षाशी नाते असणारी मंडळी आहेत. असे लोक न्यायालयात जाणार हे गृहीत धरले होते. त्यामुळे आम्ही न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. मराठा आरक्षणाचा कायदा “फुल प्रूफ’ करण्यात आला असून हे आरक्षण टिकावे यासाठी सरकारने सर्व हवी ती तयारी केली आहे, असेही तावडे यांनी सांगितले.

मुंबई: मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल होणार हे अपेक्षित असताना हे आरक्षण न्यायालयात टिकावे यासाठी सरकार वकिलांची फौज उभी करणार आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवरील वकिलांशी बोलणी सुरु असून त्यांनी सरकारला साथ देण्याचे मान्य केले आहे. ही कायदेशीर लढाई आपण जिंकणारच, असा आत्मविश्वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मराठा आरक्षणविरोधात याचिका दाखल झाली आहे. पण याचा काहीच फरक पडत नाही. सरकारनेही आरक्षण टिकविण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईसह नागपूर आणि संभाजीनगर खंडपीठाकडे तसेच सर्वोच्च न्यालयालयात वैॅव्हेट दाखल करण्यात आले आहे. आरक्षणाविरोधीाल कायदेशीर लढाई लढावी लागणार. हे सरकारने गृहीत धरले असून ही कायदेशीर लढाई आपण जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आरक्षण टिकविण्यासाठी वकिलांशी जोरदार सल्लामसलत सुरू आहे. वरिष्ठ पातळीवरील वकिलांशी बोलणे झाले आहे. त्यांनी सरकारला साथ देण्यासाठी आणि हा कायदा न्यायालयात टिकण्यासाठी ही लढाई लढू असे आश्वासन दिले आहे. ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे यांच्याशीही सल्लामसलत केली आहे. ज्यावेळी वेळ येईल तेव्ही मी स्वत: फिल्डमध्ये उतरेन असे त्यांनी आश्वासन दिल्याचे पाटील यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)