आरक्षण टक्‍क्यांनुसार विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश

मागासवसर्गीय आरक्षण टक्‍क्‍यानुसार शासकीय वसतीगृहात प्रवेश


शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी आरक्षण टक्‍केवारीची अट


शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी टक्‍केवारीनुसार आरक्षण


शासकीय वसतीगृहांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी वेगवेगळे आरक्षण

पुणे – राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या वसतीगृहाच्या प्रवेशासाठी आता मागासवर्गीय प्रवर्गाच्या आरक्षण टक्‍केवारीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

शासकीय वसतीगृहांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी वेगवेगळे आरक्षण निश्‍चित करण्यात आलेले आहे. जुन्या वसतीगृहांच्या प्रवेशासाठी 16 मे 1984 व नवीन वसतीगृहांसाठी 2012 च्या शासन निर्णयाप्रमाणे आरक्षण निश्‍चित करण्यात आलेले आहे. नवीन वसतीगृहे व जुनी वसतीगृहे असे वेगवेगळे आरक्षण निश्‍चित करण्यात आल्यामुळे प्रवेश प्रक्रिया गुंतागुंतीची झालेली असून वसतीगृहासाठी आरक्षणाची वेगवेगळी टक्‍केवारी लावण्यासंदर्भात नागपूरच्या महालेखापालांनी लेखापरिक्षणामध्ये आक्षेप नोंदविलेले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वसतीगृहांच्या प्रवेशप्रक्रियेत एकसूत्रता राहावी व प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी वेगवेगळ्या शासन निर्णयाद्वारे निश्‍चित करण्यात आलेले आरक्षण रद्द करण्यात आले आहे. आता आरक्षण टक्‍केवारीनुसार प्रवेश देण्यात येणार आहे. यात अनुसूचित जातीसाठी 80 टक्‍के, अनुसूचित जमातीसाठी 3 टक्‍के, विमुक्‍त जाती व भटक्‍या जमातीकरिता 5 टक्‍के, आर्थिकदृष्ट्या मागास व इतर मागास प्रवर्गासाठी 5 टक्‍के, विशेष मागासवर्गासाठी 2 टक्‍के, अंपगांकरिता 3 टक्‍के, अनाथांसाठी 2 टक्‍के याप्रमाणे एकूण 100 टक्‍के आरक्षणाची टक्‍केवारी निश्‍चित करण्यात आलेली आहे. अनुसूचित जातीसाठी राखून ठेवलेल्या जागांपैकी महापालिका क्षेत्रात व “अ’ वर्गाचा दर्जा असलेल्या नगरपालिका क्षेत्रात 14 टक्‍के जागा मातंग व मेहतर जातीसाठी आणि जिल्हा व तालुकास्तरावर मातंग व मेहतर जातीसाठी 10 टक्‍के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत.

अनुसूचित जाती प्रवर्गासाठी निश्‍चित केलेल्या आरक्षण टक्‍केवारीमध्ये कोणताही बदल न करता अनुसूचित जातीच्या प्रवर्गामधूनच भरण्यात याव्यात. मात्र इतर प्रवर्गांसाठी निश्‍चित केलेल्या 20 टक्‍क्‍यांमध्ये त्या प्रवर्गाचे विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास त्या जागा अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांमधून परिवर्तणाने भरता येतील, असे आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहसचिव दि. रा. डिंगळे यांनी जारी केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)