सासवड- सरकारने विना विलंब त्वरित मराठा समाजास आरक्षण द्यावे व देशभर सुरू असलेल्या ऍट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराबाबत गंभीर दखल घेऊन हे थांबवण्याकरिता कायदेशीर तरतूद करावी अशी मागणी आंबळे गावच्या मराठा बांधवानी सासवड येथील शिवतीर्थावर सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनात केली.
पुरंदर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने सासवड येथील शिवतीर्थावर मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. तालुक्‍यातील मराठा समाजाने जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. यावेळी शासकीय नोकरीतील समांतर आरक्षणाची अट त्वरीत काढून टाकावी अशी मागणी ही करण्यात आली. रविवारी (दि. 8) जवळार्जून गावचे मराठा बांधव शिवतीर्थावर आंदोलन करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)