आरक्षणासाठी धनगर समाजाचा जागरण गोंधळ

जेजुरी ः धनगर आरक्षणसाठी जागरण गोंधळ करताना धनगर बांधव. (छाया ः आकाश दडस)

बिदाल, दि. 14 (वार्ताहर) – यळकोट यळकोट जय मल्हार, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे असे म्हणत धनगर समाजाने आरक्षणासाठी जागरण गोंधळ घातला. आरक्षणाची पोकळ आश्वासने भाजपा सरकारने दिली, अशा घोषणा देत धनगर समाजाने भाजप सरकारचा लंगर तोड निषेधही व्यक्त केला.
धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी खडोंबाला साकडे घातले. या सरकारने धनगर समाजाची घोर फसवणूक केली आहे. गेली साडे चार वर्षे तुम्ही सत्तेत आहात. आम्ही तुमच्या मागे कितीवेळा आरक्षणाच्या मागणीसाठी यायचे? असा सवाल धनगर समाजातील एका महिलेने केला. या सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. धनगर समाजाचे लाखो जण रस्त्यावर उतरले आहेत. असे असताना सरकारला आम्हाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती दिसत नसल्याची खंत या महिलेने व्यक्त केली.
यावेळी आयोजक संतोष ठोंबरे, यशवंत प्रहारचे संस्थापक संदीप काळे, सरसेनापती शशिकांत तरंगे, पिवळं वादळचे कार्यकारी संपादक रामचंद्र घुटुकडे, लेखक आकाश दडस, ओबीसी सेलच्या अध्यक्षा प्राजक्ता कालगुंडे, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव गोफणे आणि हजारो धनगर समाजातील बांधव उपस्थित होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)