आरक्षणासाठी धनगर समाजाचा कोल्हापुरात महामोर्चा

कोल्हापूर – धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी करावी, यासह विविध मागण्यांसाठी समस्त धनगर समाज आरक्षण कृती समितीतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. तर 8 सप्टेंबरपर्यंत आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यास हातात कुऱ्हाड आणि शेळ्या-मेंढ्या घेऊन रस्त्यावर उतरु असा इशारा यावेळी देण्यात आला.

जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून धनगर बांधवांनी सकाळपासूनच दसरा चौकात जमायला सुरुवात केली. दुपारी बाराच्या सुमारास महामोर्चाला सुरुवात झाली. कपाळी भंडारा व हातात पिवळे झेंडे घेतलेल्या धनगर बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय…, राजर्षी शाहू महाराज की जय…, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर की जय…, यळकोट…यळकोट…जय मल्हार…’ असा जयघोष करत मोर्चामार्ग दणाणून सोडला.

व्हिनस कॉर्नर, बसंत-बहार रोडमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या ठिकाणी मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. सुरुवातीला धनगर समाजातील रणरागिणी व मावळ्यांना बोलण्याची संधी देण्यात आली. यानंतर मागण्यांचे निवेदन या रणरागिणींच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना देण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)