आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा एल्गार

महाबळेश्वर, दि. 7 (प्रतिनिधी) – “यळकोट यळकोट जय मल्हार’, “उठ धनगर जागा हो आरक्षणाचा धागा हो’ या घोषणांनी आरक्षणाच्या मागणीसाठी महाबळेश्वर तालुक्‍यातील धनगर समाज मंगळवारी रस्त्यावर उतरला. भर पावसात शेकडो धनगर समाज बांधव या मोर्चात झेंडे घेऊन सहभागी झाले होते.
महाबळेश्वर तालुक्‍यातील धनगर आरक्षण कृती समितीच्यावतीने धनगर बांधवानी मंगळवारी सकाळी तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढला. धनगर समाजाला आरक्षण देण्याचे निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन न पाळल्याने सरकार आमची फसवणूक करून वेळकाढूपणा करीत आहे, या सरकारवर विश्वास राहिला नाही, अशी भावना धनगर समाजबांधवांनी यावेळी व्यक्त केली. व्यक्त करीत होते. धनगर आरक्षण कृती समितीच्यावतीने जननीमाता मंदिरामध्ये दोन दिवसांपूर्वी बैठक घेत मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते. या मोर्चाची सुरुवात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर चौकातून झाली. भर पावसात शेकडो धनगर समाज बांधवांसह लोकप्रतिनिधी या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाच्या अग्रभागी “खोटी धनगड जात दाखवून’ “र’चा ‘ड’ करून गेली 70 वर्षे धनगर समाजावर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा आशयाचे फलक होता.
मोर्चात हातात झेंडे घेतलेल्या युवकांची संख्या लक्षणीय होती. शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस हार घालून मोर्चास सुरुवात झाली. मोर्चा शिवाजी चौक, मुख्य बाजारपेठ मार्गे सुभाष चौकात आला. तिथे सुभाषचंद बोस व यशवंतराव चव्हाण यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तेथून हा मोर्चा बसस्थानक, पंचायत समितीकडून तहसीलदार कार्यालयावर गेला. तिथे धनगर आरक्षण कृती समितीच्यावतीने तहसीलदार रमेश शेंडगे याना निवेदन देण्यात आले. या निवेदनासोबत तालुक्‍यात धनगड जमातीची किती लोकसंख्या आहे व आतापर्यंत किती लोकांना धनगड या जमातीचे जात प्रमाणपत्र आहे ही सर्व माहिती माहिती अधिकार अधिनियम नुसार मागणी अर्ज समितीच्या वतीने देण्यात आला. मोर्चाचा समारोप जननी माता मंदिर येथे झाला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)