आरक्षणाचा कायदा होईपर्यंत आझाद मैदानावर ठिय्या

संग्रहित छायाचित्र

मराठा समाजाचा मोर्चा विधानभवनावर धडकणार

पुणे – मराठा समाजाला घटनात्मक वैध असे आरक्षण देत तसा कायदा अधिवेशात करावा, या तसेच इतर मागण्यांसाठी येत्या सोमवारी मराठा समाजाचा मोर्चा मुंबई विधानभवनावर धडकणार आहे. जोपर्यत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यात मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर उपस्थित होते. कोंढरे म्हणाले, “मराठा समाज आरक्षणासह इतर मागण्यांची पूर्तता करून घेण्यासाठी आणि मान्य केलेल्या मागण्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.’ तर, “पुणे जिल्ह्यातून आम्ही मराठा संवाद यात्रा काढली आहे. ती मुंबईत सोमवारी पोहचेल. याशिवाय राज्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होणार आहेत,’ असेही कुंजीर यांनी सांगितले.

“या हिवाळी अधिवेशनात आम्हाला हे आरक्षण मिळाले पाहिजे, त्यासाठी ज्या कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागणार आहेत, त्या तातडीने पूर्ण कराव्यात. विरोधीपक्षांनी सहकार्य करुन आरक्षणबाबत विधिमंडळात चर्चा घडवून आणावी, असे आमचे आवाहन आहे.आम्ही कोणाचे आरक्षण मागत नाही. आम्हाला स्वतंत्र आरक्षण मिळाले पाहिजे, अशी आमची मागणी आहे. त्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळाले म्हणजे इतर कोणाच्या आरक्षणाला धक्का लागला असे समजू नये,’ असे कोंढरे यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)