मुंबई: अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सने रिलायन्स जिओ इन्फोकॉमला फायबर संपत्ती आणि त्यासंदर्भात असणाऱया पायाभूत सुविधा संपत्तीची विक्री करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या जिओने 3 हजार कोटी रुपयांनी हा व्यवहार पूर्ण केला. हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर 1.78 लाख किमी लांबीची फायबर संपत्ती रिलायन्स जिओला हस्तांतरित करण्यात येणार आहे, अशी माहिती रिलायन्स जिओकडून शेअरबाजाराला देण्यात आली.
गेल्या आठवडयात रिलायन्स कम्युनिकेशन्सने आपल्या मीडिया कन्व्हर्जेंस नोड्‌स आणि संबंधित पायाभूत संपत्तीची 3 हजार कोटी रुपयांना रिलायन्स जिओ इन्फोकॉमला विक्री करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. आपल्यावरील कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी वायरलेस स्पेक्‍ट्रम, टॉवर, फायबर आणि मीडिया कन्व्हेजन्स नोड्‌स संपत्तीची विक्री करण्यासाठी रिलायन्स जिओबरोबर करार केली होती. ऑगस्ट महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने जिओ आणि आरकॉम यांच्यातील व्यवहारासाठी ऑगस्टमध्ये मंजुरी दिली होती. या व्वहारामुळे आता कंपनीवरील कर्जाचे ओझे कमी होण्यास मदत मिळणार असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यानी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)