आरएसपी रोड सेफ्टीदल म्हणून विकसित होतोय : भोसले

चाफळ – आर. एस. पी. हा एक रोड सेफ्टीदल म्हणून विकसित होत आहे. या माध्यमातून बालवयातच मुलांच्या अंगी शिस्त व मदत करण्याची परोपकारी वृत्ती वाढीस लागून निश्‍चितच एक चांगले व्यक्‍तिमत्व उदयास येण्यास मदत होणार आहे. या शिक्षणाच्या जोरावर भविष्यात आदर्श विद्यार्थी घडतील, असे प्रतिपादन उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रताप भोसले यांनी केले.

चाफळ ता. पाटण येथील समर्थ विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित कराड-पाटण तालुक्‍यातील आर. एस. पी. बालसैनिक मेळाव्याचे समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आर. एस. पी. कोल्हापूर विभागाचे समादेशक शिवाजी सुर्यवंशी, सातारा जिल्हा समादेशक जगदाळे, पाटण तालुका समादेशक एस. जी. सूर्यवंशी, सातारचे सहाय्यक फौजदार एम. डी. नलवडे, जे. आर. पवार, हवालदार गणेश भोसले, प्राचार्य व्ही. बी. मोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश सुतार, पत्रकार उमेश सुतार, सतिश मोहिते, डी. एम. सुतार, अधिक्षक संभाजी बाबर आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मेळाव्यात सहभागी झालेल्या कराड-पाटण तालुक्‍यातील सुमारे 500 आर. एस. पी. च्या बालसैनिकांनी उपस्थित मान्यवरांना जनरल सेल्युट करीत पेटी कवायतीसह ट्रॉफिक सिग्नल कवायती तसेच बॉंब हल्ला घडल्यास जखमींवर प्राथमिक उपचार पध्दती व त्यांना कशा पध्दतीने मदत करावी, याची प्रात्याक्षिके करुन दाखवली. यावेळी महात्मा गांधी विद्यालय उंब्रज, यशवंतराव जाधव विद्यालय उंब्रज, न्यू इंग्लिश स्कूल चरेगाव, समर्थ विद्यालय चाफळ या विद्यालयांतील प्रशिक्षित विद्यार्थ्यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात करण्यात आला. कार्यक्रमास संभाजीराव देशमुख, अंकुश जमदाडे, प्रा. एकनाथ कुंभार, आर. एस. गुरव, जी. जे. दहिवले, एस. एम. शिरतोडे, सागर चव्हाण, परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)