‘आरएसएस’चा इतिहास झळकणार लवकरच मोठ्या पडद्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राजकारण आणि समाजकारणावर प्रभाव पाडणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आधारित चित्रपट लवकरच येत आहे. १८० कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमाला आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिरवा कंदिल दाखवला आहे.

कन्नड सिने ऑडियो टायकून लहरी वेलू यांना संघावर सिनेमा बनविण्याची कल्पना सुचली.  संघावर सिनेमा बनविण्याची कल्पना ‘बाहुबली’ फेम एस. राजमौली यांचे वडील विजेंद्र प्रसाद यांना सांगितली. त्यांना ही कल्पना आवडली. त्यानंतर सरसंघचालकांना भेटून त्यांच्यासमोर ही कल्पना मांडली, त्यांनी परवानगी दिल्यानंतर कामाला सुरुवात केली असल्याचं ते म्हणाले.

तथ्य आणि सत्यघटनांवर हा सिनेमा आधारीत असेल. या सिनेमातून संघाची विचारधारा, संघाची खरी ओळख, भारतासाठी दिलेलं बलिदान, त्याग या सिनेमातून दाखविण्यात येणार असल्याचे लहरी म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)