आरआयएमसी परीक्षा 1 ते 2 जूनला होणार

संग्रहित छायाचित्र

पुणे – डेहराडून येथील राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालयातील इयत्ता आठवीसाठी प्रवेश पात्रता परीक्षा येत्या 1 व 2 जूनला घेण्यात येणार आहे. यासाठी येत्या 31 मार्चपर्यंत अर्ज सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने ही आरआयएमसी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा केवळ मुलांसाठीच होणार आहे. मान्यताप्राप्त शाळांमध्ये इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत असलेल्या किंवा सातवीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार आहे. वय वर्ष तेरा असलेले विद्यार्थी परीक्षेला बसण्यासाठी पात्र समजण्यात येणार आहे. परीक्षेसाठी दिलेल्या नमुन्यातीलच अर्ज भरायचे आहेत. अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना 555 रुपयांचा तर जनरल संवर्गातील विद्यार्थ्यांना 600 रुपयांचा डिमांड ड्राफ्ट अर्जासोबत सादर करावे लागणार आहेत.

परिपूर्ण भरलेले अर्ज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या पुण्यातील कार्यालयात मुदतीतच स्पीड पोस्टाने पाठवावीत किंवा समक्ष येऊन जमा करावेत. अर्ज दोन प्रतीत सादर करावे लागणार आहेत. अर्जासोबत जन्मतारखेच्या दाखल्याची प्रत, जातीच्या दाखल्याची छायांकित प्रत, अधिवासी दाखल्याची प्रत, शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेटची प्रत जोडणे आवश्‍यक राहणार आहे.

परीक्षेसाठी इंग्रजी, गणित व सामान्यज्ञान या तीन विषयांचे लेखी पेपर असतील. हे पेपर इंग्रजी किंवा हिंदी या भाषेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती येत्या 4 ऑक्‍टोबरला घेण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी स्पष्ट केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)