“आय लव्ह यू पाचगणी’ फेस्टिव्हलचा उद्या प्रारंभ

पाचगणी – “आय लव्ह यू पाचगणी’ या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या व सर्वानाच उत्सुकता लागलेल्या फेस्टिव्हलची जय्यत तयारी सुरू आहे. हे फेस्टिव्हल दि. 7 ते 9 डिसेंबर या कालावधीत होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. फेस्टिवलचे हे सलग तिसरे वर्ष असून गेल्या दोन्ही फेस्टिवलला पर्यटकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या वर्षीसुद्धा देशी तसेच विदेशी पर्यटकांना “आय लव्ह यू पाचगणी’चा मनमुराद आनंद घेता येणार आहे.

या फेस्टिव्हलची सध्या जय्यत तयारी सुरू असून त्याअंतर्गत मुख्य बाजारपेठेतील इमारतीना रंगरंगोटी केली जात आहे. तसेच “आय लव्ह यू पाचगणी फेस्टिवल 2018′ मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दि. 7 डिसेंबर पासून या फेस्टिव्हलची सुरुवात होणार आहे.

यामध्ये संध्याकाळी कै. भाऊसाहेब भिलारे क्रीडाभूमी या ठिकाणी उद्‌घाटन सोहळ्याची सुरुवात सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार असून त्यासाठी शालेय विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर शिवाजी चौकातील मुख्य बाजारपेठेत स्थानिक रहिवाशांनी घरगुती पद्धतीचे बनविले खाऊचे पदार्थ विक्रीस ठेवले जाणार आहेत. तसेच विविध कलाकुसरीच्या बनविलेल्या वस्तूसुद्धा पहावयास मिळणार आहे. या पाचगणीच्या संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. तसेच आर्ट ऍन्ड क्रॉफ्ट आणि फ्लॉवर प्रदर्शन, हे पाहत संगीताचा आस्वाद घेता येणार आहे.

दुसऱ्या दिवशी दि. 8 रोजी सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत टेबललॅण्ड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय काईट फेस्टिवल, दुपारी 4 वा. योगा, संध्याकाळी 5:30 वा. फॅन्सी ड्रेस स्पर्धा, फक्त बारा वर्षाच्या वरील मुलांकरिता होणार आहेत. पुन्हा मार्केटमध्ये विविध महाराष्ट्रीयन खाद्य पदार्थांची मेजवाणी अनुभवता येणार आहे. तिसऱ्या दिवशी दि. 9 डिसेंबर रोजी मल्लखांब, रस्सीखेच व पुन्हा वरील कार्यक्रम होणार असून संध्याकाळी 5:30 वा. फॅन्सी ड्रेस स्पर्धा, फक्त बारा वर्षाच्या वरील मुलांकरिता होणार आहेत. पुन्हा मार्केटमध्ये विविध महाराष्ट्रीयन खाद्य पदार्थांची मेजवाणी अनुभवता येणार आहे. या तीन दिवस चालणाऱ्या “आय लव्ह यु पाचगणी 2018 फेस्टिवल’च्या माध्यमातून पाचगणीच्या संस्कृतीचे दर्शन घडणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
11 :thumbsup:
12 :heart:
5 :joy:
1 :heart_eyes:
6 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)