रेडा- इंदापूर येथील आय कॉलेज विद्यार्थी संशोधन प्रकल्प प्रदर्शनात स्पर्धेत 122 प्रकल्प विद्यार्थांनी सादर केल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे आणि संशोधन प्रकल्प स्पर्धेचे समन्वयक डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. संस्थेचे सचिव मुकुंद शहा यांनी या प्रदर्शनाचे उद्‌घाटन केले. ही स्पर्धा कला मानव्य विद्या , वाणिज्य, मूलभूत विज्ञान, कृषी व पशुसंवर्धन, अभियांत्रीकी व तंत्रज्ञान व औषध निर्माणशास्त्र या सहा विभागात घेण्यात आल्या. स्पर्धेत मध्ये 229 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.योगेश धनवडे व पूजा चोपडे यांनी सादर केलेला रिमूव्हल ऑफ टॉक्‍झीक लेड वेस्ट वॉटर यूजींग निम पावडर, प्रतिक पांढरे व रूपाली तारे यांनी सादर केलेला निकोटीन ऍज इंसेक्‍टी साईड, शितल कोकरे व नेहा देशमुख यांनी सादर केलेला मेकींग ऑफ हर्बल टी फ्रॉम मेडिसीनल प्लांट आदी प्रकल्प विद्यार्थांचे लक्ष वेधुन घेत होते. याप्रसंगी संशोधन प्रकल्प स्पर्धेचे सहाय्यक समन्वयक प्रा. अब्दुललतीब शेख, डॉ.राजेंद्र साळुंखे, प्रा. विरेश होळकुंदे, डॉ.पी. एस. कबनुरकर, प्रा. डी. के. भोसले, डॉ. आर. पी. गावडे, डॉ. एस. एन. पवार आदीं मान्यवरांनी परीक्षण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)