‘आय एम नॉट युअर निग्रो’ लघुपटाच्या प्रदर्शनाने ‘मिफ 2018’ची शानदार सुरुवात

सुवर्णशंख आणि रौप्यशंख पुरस्कारासाठी 68 चित्रपटांमध्ये स्पर्धा

मुंबईतला बहुप्रतिक्षित माहितीपट चित्रपट महोत्सव, मुंबई आंतरराष्ट्रीय माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन चित्रपट महोत्सव, मिफ 2018 ची मुंबईतल्या एनसीपीए सभागृहात ‘आय एम नॉट युवर निग्रो’ या ऑस्कर नामांकित लघुपटाने रंगतदार सुरुवात झाली.

माहितीपट निर्मात्यांना या महोत्सवाच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नांचे गौतम घोष यांनी कौतुक केले. मिफ हा भारतासाठी मानबिंदू असल्याचे गौरवोद्गार त्यांनी आपल्या उद्‌घाटनपर भाषणात काढले. सातत्यपूर्वक आणि मोठ्या उत्साहाने मिफचे आयोजन करत असल्याबद्दल फिल्मस् डिव्हिजन आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांचे घोष यांनी अभिनंदन केले.

-Ads-

या उद्‌घाटन सोहळ्यात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय ज्युरी सदस्यांची ओळख करुन देण्यात आली. यंदाच्या आंतरराष्ट्रीय ज्युरी सदस्यांमध्ये कॅनडाच्या चित्रपट निर्मात्या एलिसा पलोस्की (अध्यक्ष), फ्रेंच माहितीपट निर्माते डॉमनिक दुबॉस्क, फिलिपिन्सच्या चित्रपट निर्मात्या आणि विचारवंत बेबी रूथ विलारमा, सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते हाओबम पबन कुमार आणि ॲनिमेशन तज्ञ आशिष कुलकर्णी, यांचा समावेश आहे.

तर राष्ट्रीय चित्रपटांच्या स्पर्धा गटासाठी ज्युरी म्हणून चित्रपट समीक्षक आणि लेखिका मैथिली राव ( अध्यक्ष), तुर्कस्थानचे ॲनिमेटर बेरात ईक, फ्रेंच लेखक आणि चित्रपट निर्माते, पेरी असोलीन,राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते एम पी सुकुमारन नायर आणि अरुण चढ्ढा हे सदस्य आहेत.

उद्घाटन सोहळ्यात ओडीशाच्या प्रिन्स डान्स समूहाच्या रंगतदार, नेत्रदीपक नृत्याने रसिकांची मनं जिंकली. ‘इंडिया गॉट टॅलेंट’ या कार्यक्रमात या पथकाने पुरस्कार जिंकला होता. एक आठवडा चालणाऱ्या या महोत्सवात 40 पेक्षा अधिक देशातील 430 हून अधिक माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन पट दाखवले जातील.

माहितीपट आणि लघुपटांसाठीचा दक्षिण आशियातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा असलेला हा महोत्सव 1990 साली सुरू झाला. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील फिल्म डिव्हिजनच्या वतीनं हा द्वैवार्षिक महोत्सव आयोजित केला जातो.

प्रतिष्ठेच्या सुवर्णशंख पुरस्कारासाठी स्पर्धेत असलेल्या उत्तमोत्तम महितीपट आणि लघुपटांची मेजवानी चित्र रसिकांना यावेळी मिळेलच,त्याशिवाय, यंदाच्या मिफमध्ये ज्युरीनी निवडलेले काही जुने दर्जेदार देशी परदेशी माहितीपट रसिकांना बघायला मिळतील. ॲनिमेशन चित्रपटांच्या गटात रशियाचा इव्हान मॅक्सीमोव्ह, तुर्कस्थानचा ब्रेट ईक आणि ब्राझीलचा ली झागुरी, यांचे ॲनिमेशन चित्रपट असतील.

फ्रेंच लघुपट आणि प्रायोगिक चित्रपटांचा एक  विशेष विभाग ही या महोत्सवात असेल. गब्रिएल ब्रेनेन यांनी या चित्रपटाचे संकलन केले आहे. 29 जानेवारीला हे चित्रपट दाखवले जातील. बेस्ट ऑफ द फेस्ट या पॅकेजमध्ये बर्लिनेल, हॉटडॉकस, कॅनडा, मेलबर्न, मेक्सिको इथल्या नावाजलेल्या चित्रपट महोत्सवातले काही महितीपट दाखवले जातील.

ज्येष्ठ इराणी चित्रपट दिग्दर्शक रक्शन बेनितेमाद यांच्या रेट्रोस्पेक्टिव्हमध्ये 3 दशकांमधील 3 माहितीपटांचा समावेश असेल. अन्य रेट्रोस्पेक्टिव्हजमध्ये फ्रेंच चित्रपट दिग्दर्शक डॉमिनिक दुबोस, मधुश्री दत्ता आणि प्रसिद्ध ॲनिमेटर भीमसेन खुराना यांच्या चित्रपटांचा समावेश आहे. मुंबईतील फिल्म्स डिविजन संकुल आणि रशियन कल्चर सेंटरमधील थिएटर्समध्ये 29 जानेवारी 2018 पासून चित्रपट दाखवले जाणार आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)