“आय एम नॉट युअर निग्रो’ लघुपटाने “मिफ 2018′ ची सुरुवात

सुवर्णशंख आणि रौप्यशंख पुरस्कारासाठी 68 चित्रपटांमध्ये स्पर्धा

मुंबई – मुंबईतला बहुप्रतिक्षित माहितीपट चित्रपट महोत्सव, मुंबई आंतरराष्ट्रीय माहितीपट, लघुपट आणि निमेशन चित्रपट महोत्सव, अर्थात “मिफ 2018′ ची आज मुंबईतल्या एनसीपीए सभागृहात ‘आय एम नॉट युवर निग्रो’ या ऑस्कर नामांकित लघुपटाने रंगतदार सुरुवात झाली. या उदघाटन सोहळ्याला देशविदेशातल्या माहितीपट आणि लघुपट निर्मात्यांची मांदियाळी अनुभवता आली. या महोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ चित्रपट आणि माहितीपट निर्माते गौतम घोष होते. किरण शांताराम, मृणाल कुलकर्णी, माईक पांडे यांच्यासह चित्रपट क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने महोत्सवाची शोभा वाढली.

-Ads-

माहितीपट निर्मात्यांना या महोत्सवाच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नांचे गौतम घोष यांनी कौतुक केले. मिफ हा भारतासाठी मानबिंदू असल्याचे गौरवोद्गार त्यांनी आपल्या उद्‌घाटनपर भाषणात काढले. सातत्यपूर्वक आणि मोठ्या उत्साहाने मिफचे आयोजन करत असल्याबद्दल फिल्मस्‌ डिव्हिजन आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांचे घोष यांनी अभिनंदन केले.

यंदाच्या आंतरराष्ट्रीय ज्युरी सदस्यांमध्ये कॅनडाच्या चित्रपट निर्मात्या एलिसा पलोस्की (अध्यक्ष), फ्रेंच माहितीपट निर्माते डॉमनिक दुबॉस्क, फिलिपिन्सच्या चित्रपट निर्मात्या आणि विचारवंत बेबी रूथ विलारमा, सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते हाओबम पबन कुमार आणि निमेशन तज्ञ आशिष कुलकर्णी, यांचा समावेश आहे. तर राष्ट्रीय चित्रपटांच्या स्पर्धा गटासाठी ज्युरी म्हणून चित्रपट समीक्षक आणि लेखिका मैथिली राव ( अध्यक्ष), तुर्कस्थानचे निमेटर बेरात ईक, फ्रेंच लेखक आणि चित्रपट निर्माते, पेरी असोलीन,राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते एम पी सुकुमारन नायर आणि अरुण चढ्ढा हे सदस्य आहेत.

उद्घाटन सोहळ्यात ओडिशाच्या प्रिन्स डान्स समूहाच्या रंगतदार, नेत्रदीपक नृत्याने रसिकांची मनं जिंकली. ‘इंडिया गॉट टॅलेंट’ या कार्यक्रमात या पथकाने पुरस्कार जिंकला होता. एक आठवडा चालणाऱ्या या महोत्सवात 40 पेक्षा अधिक देशातील 430 हून अधिक माहितीपट, लघुपट आणि निमेशन पट दाखवले जातील.

या चित्रपट महोत्सवामध्ये प्रतिष्ठेच्या सुवर्णशंख पुरस्कारासाठी स्पर्धेत असलेल्या उत्तमोत्तम महितीपट आणि लघुपटांची मेजवानी चित्र रसिकांना यावेळी मिळेल, त्याशिवाय, यंदाच्या मिफमध्ये ज्युरीनी निवडलेले काही जुने दर्जेदार देशी परदेशी माहितीपट रसिकांना बघायला मिळतील. ऍनिमेशन चित्रपटांच्या गटात रशियाचा इव्हान मॅक्‍सीमोव्ह, तुर्कस्थानचा ब्रेट ईक आणि ब्राझीलचा ली झागुरी, यांचे निमेशन चित्रपट असतील. तर फ्रेंच लघुपट आणि प्रायोगिक चित्रपटांचा एक विशेष विभाग ही या महोत्सवात असेल. गब्रिएल ब्रेनेन यांनी या चित्रपटाचे संकलन केले आहे. 29 जानेवारीला हे चित्रपट दाखवले जातील.

विद्यार्थ्यांचा सहभाग हे मिफ्फ 2018 चे आणखी महत्वाचे वैशिष्ट्‌य आहे. एफटीआयआय, सत्यजित रे फिल्म न्ड टीव्ही इन्स्टिट्यूट, व्हिसलिंग वूडस, एमजीआर फिल्म न्ड टीव्ही इंन्स्टिट्यूट, प्रयासम, रोहटकचे राज्य विद्यापीठ, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन आदी संस्थांच्या विद्यार्थ्यांचे चित्रपटही या महोत्सवादरम्यान दाखवले जाणार आहेत.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)