‘आयुष्य एकच आहे पण मला ते रोज जगायचं आहे’…

सातत्याने सामाजिक प्रश्नांना भिडण्याची उर्मी आणि प्रत्यक्ष कामांवर भर देणाऱ्या तेजश्री देवडकरची गोष्ट…

तेजश्री विजयसिंह प्रियंका देवडकर आपल्या नावांतूनच स्त्रीयांना समान हक्क, वागणुक मिळावी यांसाठी आईचं नाव प्राधान्याने लावणाऱ्या तेजश्रीचा जन्म मुळचा सांगलीचा. वडील शिक्षक असल्याने तिचं संपुर्ण शिक्षण बदलापुरात झालं. 8 वी पर्यंत मराठी त्यानंतर सेमी इंग्रजी पुढे उल्हासनगराच्या चांदीबाई महाविद्यालयात 12 वीचे शिक्षण कला शाखेतुन घेतले. आजोबा सलग 15 वर्ष गावांचे सरपंच आणि वडील उत्कृष्ट समुपदेशक दोघांच्या कामांतुन प्रेरणा घेवुन 12 वी नंतर समाजकार्याचे व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी मुंबईच्या समाजकार्य महाविद्यालय निर्मला निकेतन येथे BSW या पदवीच्या अभ्यासक्रमाला तेजश्रीने प्रवेश घेतला आणि खऱ्या अर्थाने तेजश्रीच्या कामांची सुरुवात झाली.

 

पहिल्या वर्षी प्रा. समन अफ्रोज यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आर्थिक विकास महामंडळ या संस्थेबरोबर महिला सबलीकरण या विषयांवर काम करण्याची तिला संधी मिळाली दुसऱ्या वर्षी प्रा. प्रभा तिरमारे आणि उल्का महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वहारा जन आंदोलन या संघटनेबरोबर आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी काम कसे केले जावु शकते हे तिला शिकता आले तर तिसऱ्या वर्षी प्रा. वैजयंता आनंद आणि स्वाती मुखर्जी यांच्याबरोबर दि. वात्सल्य फाउंडेशन बरोबर शिक्षण विषयक व्यापक काम जवळुन हाताळण्याची संधी तिला प्राप्त झाली. दरम्यानच्या काळात तेजश्रीने साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात कार्यकर्ता शिबीर, भारतीय छात्र सांसद, ग्रामीण अध्ययन शिबीर धुळे- मुंबई तसेच विविध युवामेळावे आणि चर्चासत्रे यांत सहभाग नोंदवला. सातत्याने नवीन शिकण्याची आवड आणि त्यांसाठी प्रवास करणे तेजश्रीचा आवडीचा छंद आणि त्याचबरोबर आपल्या अनुभवांतून विविध सामाजिक विषयांवर कविता आणि मत मांडणे हे तिचे आवडीचे काम.

नुकताच भारत आणि श्रीलंका या दोन देशांतील पर्यावरण, युवकांचे प्रश्न आणि शिक्षणाची परिस्थिती यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तेजश्रीने श्रीलंका येथे अभ्यासदौरा केला. भारतीय छात्र संसदेत या अभ्यासदौऱ्याच्या अहवालाचे लोकार्पण झाले त्यावेळी श्रीलंका दौऱ्याला गेलेल्या भारतीय संघात एकमेव मुलगी होती म्हणुन देशाची प्रतिभाताई पाटील म्हणुन यावेळीं तेजश्रीला संबोधले गेले. तेजश्री पूर्णपणे चळवळीत सहभागी नसली तरी एकीचे बळ दिसले पाहिजे म्हणुन सातत्याने युवकांचे प्रश्न त्यांतही फी वाढ आणि महिलांच्या समस्या यांवर ती वारंवार बोलते. सध्या तेजश्री विविध सामाजिक संस्थाबरोबर स्वयंसेवक म्हणुन काम करत आहे यांत प्रामुख्याने अंघोळीची गोळी या संस्थेबरोबर पाणी बचतीसाठी प्रयत्न करत आहे.

विविध ठिकाणी पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी ती धडपडत आहे प्रेम, बंधुभाव, त्याग आणि बचत हे सांगणारी अंघोळीची गोळी तेजश्री स्वतः तर घेतेच शिवाय इतरांनाही पाण्याचे महत्व आणि बचतीची गरज पटवुन देते. त्याचबरोबर साद फाउंडेशन, अंबरनाथ या संस्थेबरोबर तेजश्री एकंदरच आदर्श गाव या संकल्पनेवर काम करत आहे. यांत प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य या विषयांवर ती वेळ मिळेल तसे आपले योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे. कोणतेही काम, सामाजिक काम करतांना आपली स्वतःची ग्रोथ होत असते त्यामुळें काम करण्यास उत्साह मिळतो विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या लोकांशी ओळख होते एकमेकांचे अनुभव, ज्ञानाची देवाणघेवाण करता येते या सर्व गोष्टी तुम्हांला एक व्यक्ती म्हणुन घडवण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतात असें तेजश्री सांगते. पुस्तकांनी कायमचं तेजश्रीला प्रोत्साहन देण्याचे काम केले त्यामुळें गावं तिथे ग्रंथालय या मोहिमेत सक्रियपणे काम करण्याची आवड तिला निर्माण झाली मुंबई ठाणे शहर परिसरात घेतलेल्या पुस्तकं संकलन मोहिमेत तेजश्री आणि तिच्या संपुर्ण टीमने लक्षवेधी कामगिरी केली एकत्रित प्रयत्नांतून त्यांनी आजवर चार ठिकाणी ग्रंथालय उभारण्यासाठी पुस्तके दिली.

जुनी, वाचुन झालेली पुस्तके संकलन करणारी तेजश्री आणि तिची संपुर्ण टीम पुस्तकांबरोबर मोठ्या प्रमाणात जुने कपडे देखील जमा करतात आणि दुर्गम आदिवासी भागांत वाटतात. पुढील काळात शिक्षणाबरोबरच पर्यावरण, महिलांचे आरोग्य आणि प्रामुख्याने पाणी प्रश्नांवर काम करण्याचा तेजश्रीचा मानस आहे. चळवळी आणि मोर्चे, आंदोलन यांमुळे विषयांची व्याप्ती नक्कीच वाढते त्याचबरोबर त्यामुळें किमान आपल्या वयक्तिक प्रश्नांसाठी युवकांनी बोलावं सातत्याने लेखन करावं यांसाठी तेजश्री आपल्या संवाद कौशल्यातुन आणि चळवळीच्या गाण्यातुन शाळेतील मुलांबरोबर सातत्याने संवाद साधते. अनेक सामाजिक कामांत सक्रियपणे सहभागी असलेली तेजश्री मी काहीच केलं नाही फक्त सातत्याने काहीतरी नवीन करण्याचा माझा प्रयत्न असतो असे आवर्जून सर्वांना सांगते. मुलींनी हवं तितकं ऍडजस्ट करावं मात्र कॉप्रोमाईज करू नये हा तेजश्रीचा संदेश बहुमोलाचा ठरतो. सामाजिक, राजकीय परिस्थिती कितीही अस्वस्थ करणारी असली तरी त्या अस्वस्थतेला उत्तरं आहे ते म्हणजे जात, धर्म, लिंग कोणत्याच प्रकारचा भेदभाव न करता एकत्र येवुन परिस्थितीचा सामना करणे, युवकांनी शक्‍य तितकी मेहनत करावी जे आपल्याकडे जास्तीचं आहे ते इतरांना द्यावं आणि जे नाही ते मिळवण्यासाठी प्रयत्न करणं यांतून आजवर घडत गेलेल्या तेजश्रीची ही कहाणी…

– अविनाश पाटील


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2576 :thumbsup:
113 :heart:
0 :joy:
16 :heart_eyes:
8 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)