कोल्हापूर – केंद्र सरकारच्या ‘आयुष्यमान भारत’ या योजनेंतर्गत राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियान राबविण्यात येत असून, ही योजना नागरिकांसाठी सुरक्षा कवच आहे. या योजनेंतर्गत ग्रामीण लाभार्थी पडताळणी, अतिरिक्त माहिती संकलन मोहिम १५ एप्रिल २०१८ ते २१ मे २०१८ या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.  ‘आयुष्यमान भारत’ योजनेंतर्गत आयोजित उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी डॉ. खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला  उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, प्र. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे यांच्यासह गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

‘आयुष्यमान भारत’ योजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियानासाठी जिल्ह्यात ३० एप्रिल २०१८ रोजी ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. खेमनार म्हणाले की, ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक, आरोग्यसेवक तसेच आशा यांच्या सहकार्याने अतिरिक्त माहिती छापील नमुन्यात गोळा करण्यात येणार आहे.  ग्रामसभेमध्ये कुटुंबप्रमुखाची माहिती. लिहिली जाईल. कुटुंबप्रमुखाची माहिती उपलब्ध नसल्यास इतर सदस्यांची माहिती नोंदवावी. तसेच, कुटुंबात अतिरिक्त व्यक्तीची माहिती भरणे, नांवे वगळणे आदी माहिती संकलित करण्यात येणार आहे. सर्व लाभार्थ्यांची नोंदणी करावी, असे डॉ. खेमनार यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)