आयुष्यमान भारत उपक्रमाच्या माध्यमातून 50 कोटी भारत‍ीयांना आरोग्य सेवा

परभणी : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत हा उपक्रम सुरु करुन या उपक्रमाच्या माध्यमातून 50 कोटी भारतीयांना 5 लक्ष रुपयांपर्यंतच्या आरोग्य सेवा खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत उपलब्ध करुन दिल्या जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

फडणवीस म्हणाले की, परभणी वासियांसाठी सर्व सोयीयुक्त व अद्ययावत अशा हॉस्पीटलच्या माध्यमातून रुग्णांना दर्जेदार अशी सेवा उपलब्ध करुन दिल्याबद्दल डॉ.पाटील यांचे अभिनंदन करत रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यासाठी राज्यातील प्रत्येक शहरात अशा प्रकारच्या मल्टी स्पेशालिटी आवश्यकता आहे. राज्य शासनामार्फत महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातुनही राज्यातील लाखो जनतेला उपचाराची सोय उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)