आयुष्मान खुरानाच्या लग्नाचा वाढदिवस 

आयुष्मान खुरानाच्या लग्नाचा वाढदिवस नुकताच झाला. त्यानिमित्ताने त्याने सोशल मिडीयावर एक सुंदर पोस्ट टाकली आहे. तो आणि त्याची पत्नी ताहिराबरोबरचा एक सुंदर फोटो त्याने पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने आपल्या पत्नीबाबतच्या भावना अतिशय रोमॅंटिक शब्दांमध्ये व्यक्‍त केल्या आहेत. “मेरे बचपन का प्यार. एक दशक बनाया है. हॅपी ऍनिव्हर्सरी. प्यार हो तो ऐसा’ असे आयुष्मानने म्हटले आहे. आपल्या पत्नीसाठी त्याने करवा चौथचा उपवासही केला होता. दरवेळी पतीसाठी पत्नीनेच का उपवास करायचा. पतींनीही आपल्या पत्नीसाठी उपवास करायला पाहिजे.

वर्षातून एकच दिवस आपल्याला पत्नीसाठी काही तरी करायची संधी मिळते आहे. यामुळे तिला नक्की आनंद होईल असे वाटले होते. अर्थात त्यामुळे सगळ्यांनाही आनंद होईल, असाही त्याचा अंदाज होता. आयुष्मानची पत्नी ही त्याची लहानपणची मैत्रिणच आहे. नुकतेच ब्रेस्ट कॅन्सरच्या आजारपणातून ती बरी झाली आहे. त्यामुळे आयुष्मानला तिच्याबद्दल खूपच काळजी वाटते आहे. “अंधाधुन’ आणि “बधाई हो’ हे लागोपाठ हिट झाल्यामुळे आयुष्मान भलताच खुशीत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)