आयुषमान भारत योजनेतून पश्‍चिम बंगाल बाहेर 

सगळे श्रेय मोदी सरकार लाटत असल्याचा ममतांचा आरोप

कोलकता  – आयुषमान भारत या मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेतून पश्‍चिम बंगाल सरकार बाहेर पडले आहे. संबंधित निर्णय जाहीर करताना त्या राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आरोग्य योजनेच्या नावाखाली मोदी सरकार घाणेरडे राजकारण करत असल्याचा आरोप केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी ऑगस्टमध्ये आयुषमान भारत योजनेचा प्रारंभ केला. त्या योजनेंतर्गत गरीब कुटूंबांना दरवर्षी पाच लाख रूपयांपर्यंतचे आरोग्य कवच पुरवण्याचे लक्ष्य समोर ठेवण्यात आले. त्या योजनेंतर्गत केंद्र आणि राज्यांनी 60:40 प्रमाणात खर्च वाटून घ्यायचा आहे. मात्र, योजनेचे श्रेय केवळ मोदी घेऊ इच्छित असल्याचा आरोप करत ममतांनी त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

योजनेशी संबंधित पत्र पश्‍चिम बंगालमधील प्रत्येक कुटूंबाला पाठवले जात आहे. त्या पत्रात मोदींच्या छायाचित्राचा आणि भाजपच्या चिन्हाचा (कमळ) वापर करण्यात आला आहे. योजनेचे सगळे श्रेय मोदी सरकारला घ्यायचे असेल तर त्यावर आम्ही खर्च कशासाठी करायचा, असा सवाल ममतांनी केला. नोटाबंदी आणि जीएसटीच्या माध्यमातून मोदी सरकारने आधीच बॅंकिंग व्यवस्था उद्धवस्त केली. आता पक्षाच्या प्रचारासाठी सरकारी पैशांचा वापर सुरू आहे, अशा आरोपांची सरबत्ती त्यांनी पुढे केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)