आयुर्वेद तज्ज्ञाची विशेष सचिव म्हणून नियुक्ती

नवी दिल्ली, दि. 20 – केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने आपल्या विभागात एका आयुर्वेद तज्ज्ञाची विशेष सचिव म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्य राजेश कोटेचा असे त्यांचे नाव असून त्यांची ही नियुक्ती तीन वर्षांसाठी असणार आहे. मंत्रालय पातळीवर अशा पदासाठी शासकीय सेवेतल्याच वरीष्ठ अधिकाऱ्याची निवड करण्याची प्रथा आहे. पण कोटेचा यांच्याबाबतीत हा अपवाद करण्यात आला आहे. वैद्य कोटेचा हा जयपुरमधील चक्रपाणी आयुर्वेदी क्‍लिनीकमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. सरकारी कामकाजात अधिक व्यवहारीपणा आणण्यासाठी खासगी क्षेत्रातील विषेशज्ञाची मदत घेण्याचे सरकारचे धोरण आहे त्यानुसारच ही नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्यावर्षीही प्रसिद्ध सॅनिसेटशन एक्‍स्पर्ट परमेश्‍वरन अय्यर यांची पाणी पुरवठा मलनिस्सारण विभागात विशेष सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)