आयुग्रामतर्फे शेतमाल निर्यातीबाबत रविवारी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

सातारा, दि. 15 (प्रतिनिधी) – आपण कष्टाने पिकवलेल्या शेतमालाची निर्यात कशी करावी, याची माहिती अनेक शेतकऱ्यांना नसते. ही पद्धत साध्या-सोप्या पद्धतीने आयुग्राम विकास ट्रस्टच्या वतीने शेतकऱ्यांना सांगण्यासाठी सातारा येथे दि. 18 रोजी आयुग्राम परिषद आयोजित केली असून यामध्ये कृषी क्षेत्रातील नावाजलेले तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असल्याची माहिती ट्रस्टच्या वतीने सुरेंद्र काकडे यांनी दिली.
सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काकडे म्हणाले, शेतकऱ्यांच्या मुलांना सेंद्रीय शेती, कृषी उद्योग, उपलब्ध साधनसंपत्ती, प्रदुषणविरहीत हवामान, पाणी आणि ग्रामीण भागातच अर्थाजनाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आयुग्राम ट्रस्ट कार्यरत आहे. ट्रस्टच्या वतीने दि. 18 रोजी आयुग्राम परिषद आयोजित केली आहे. यामध्ये विविध तज्ज्ञांची व्याख्याने होणार आहेत. राज्याचे कृषीपरिषद महासंचालक शेखर गायकवाड शेतकऱ्यांनो सावधान या विषयावर व्याख्यान देणार आहेत. जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे शेतकरी आणि बॅंकेच्या योजना या विषयावर तर अतुल राडकर शेती उत्पादने आणि निर्यात या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच शेतकरी, शेती उद्योग आणि पैसा या विषयावर राजेंद्र सुर्यवंशी मार्गदर्शन करणार आहेत. चार तासांच्या या कार्यक्रमात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाबरोबरच शेतकऱ्यांशी संवाही साधला जाणार आहे. जास्तीत युवा शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)