आयुक्‍तालयासाठी दोन सहाय्यक पोलीस आयुक्‍तांची नियुक्‍ती

पिंपरी- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालयासाठी दोन सहाय्यक पोलीस आयुक्‍तांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने सोमवार दि. 29 ला काढले. या नियुक्‍तीनंतर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालायकडे पाच सहाय्यक पोलीस निरीक्षक झाले असून आणखी फोन सहाय्यक पोलीस आयुक्‍तांची आयुक्‍तालयास आवश्‍यकता आहे. सहाय्यक पोलीस आयुक्‍त नीलिमा जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्‍त रामचंद्र जाधव यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्‍त नीलिमा जाधव विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर येथे पोलीस उप अधीक्षक वाचक पदावर होत्या. सहाय्यक पोलीस आयुक्‍त रामचंद्र जाधव दहशतवाद विरोधी पथक, औरंगाबाद येथे पोलीस उप अधीक्षक म्हणून होते. रामचंद्र जाधव यांनी यापूर्वी देखील पिंपरी चिंचवड परिसरात काम केले आहे. त्यांनी महाकाली टोळीचा म्होरक्‍या महाकाली आणि सतीश शेट्टी खून प्रकरणातील आरोपी शाम दाभाडे व त्याचा साथीदार धनंजय शिंदे यांचा एन्काऊंटर केला आहे. त्यामुळे त्यांच्या पुन्हा पिंपरी चिंचवड शहरात येण्याने दहशत पसरवणारांना चांगलाच धाक बसणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)