आयुक्‍तालयासाठी “तालेरा’चा निधी वर्ग

पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कामकाजाला स्वातंत्र्य दिनापासूनच सुवात झाली आहे. मात्र अद्याप आयुक्तालयाला हक्काची इमारत मिळालेली नाही. प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले शाळेच्या इमारतीत आयुक्तालय होत असून येथील विद्युत यंत्रणेसाठी 43 लाखांचा खर्च होणार आहे. निधीची चणचण असल्याने महापालिकेकडून तालेरा रुग्णालयाचा निधी त्यासाठी वर्ग करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या वतीने तालेरा रुग्णालयाची जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. हे काम एस. एस. साठे या कंत्राटदाराला देण्यात आले आहे. या कामासाठी 39 कोटी 13 लाख रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली. आहे. तर पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीसाठी 43 लाख रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. त्यासाठी तालेरा रुग्णालयाच्या इमारतीच्या खर्चातील निधी आयुक्तालयासाठी ताताडीची बाब म्हणून वर्ग करण्यात येणार आहे.

विधी समितीच्या आज (शनिवारी) होणाऱ्या सभेसमोर हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार महापालिकेच्या तालेरा रुग्णालयाची सध्या इमारत पाडून तेथे नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. या कामाचा निधी तुर्तास आयुक्तालयाच्या कामकाजासाठी वळवण्यात येणार आहे. आयुक्तालयाच्या इमारतीचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. रंगरंगोटी तसेच फर्निचरसाठीही निविदा मागविण्यात आल्या आहेत. आयुक्तालयाचे तुर्तास काम चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर येथून सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)