आयुक्‍तालयात सायबर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र यंत्रणा

पिंपरी – स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचे बस्तान टप्प्या-टप्प्याने बसत असून शहरातील वाढते सायबर गुन्हे लक्षात घेता शहरात लवकरच स्वतंत्र सायबर लॅब व पोलीस ठाणे निर्माण केले जाणार आहे. यासाठी वरीष्ठ पातळीवर बैठका सुरु असल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मकरंद रानडे म्हणाले की, आयुक्तालयाकडे वर्ग केलेल्या मनुष्यबळातून आयुक्‍तालयातील विविध विभाग व यंत्रणा सुरु करण्यात येत आहेत. शहरातील सायबर गुन्ह्यांची संख्या पाहता लवकरच स्वतंत्र सायबर लॅब व स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील आहोत. त्यासाठी वरीष्ठ पातळीवर होणाऱ्या बैठकांमध्ये ही मागणी लावून धरत आहोत. तशी मान्यता, तसेच आवश्‍यक मनुष्यबळ मिळताच हा विभाग सुरु होईल. इतर गुन्ह्यांप्रमाणे सायबर गुन्हे कमी करण्यावरही आमचा भर असणार आहे, असे रानडे यांनी स्पष्ट केले.

पोलीस आयुक्तालयातील मनुष्यबळ वर्गीकरणावरुन वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमधील वर्चस्ववादाची ध्वनीफीत व्हायरल झाली आहे. याबाबत रानडे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, पुणे ग्रामीण व पुणे शहर पोलीस यांच्याशी आमचा कोणताही वाद नसून दोन्ही आयुक्तालयात समन्वय चांगला आहे. त्यामुळे मनुष्यबळ त्यांनी पाठवले असून ते रुजू देखील झाले आहेत. तसेच ज्यांनी मनुष्यबळाबाबत पोलीस अधिकाऱ्यांमधील संभाषणाची ध्वनीफीत “व्हायरल’ केली त्याचा तपास आम्ही करत आहोत. पोलिसांचे अंतर्गत संभाषण अथवा ध्वनीफीत “व्हायरल’ करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. यामध्ये जो कोणी दोषी आढळेल व ज्यांनी-ज्यांनी ही ध्वनीफीत “व्हायरल’ केली त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)