पुणे : आयुक्तांचे शुट ऍट साईटचे आदेश ?

मोक़ाट डुक्कर दिसताच मारून टाकणार – महापालिकेचे जाहीर निवेदन

पुणे  : शहरात मोकट अथवा भटकी डुकरे दिसल्यास त्यांना ताबडतोप जप्त करून मारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका अधिनियमातील तरतूदीचा आधार महापालिका प्रशासनाने घेतला असून, महापालिकेकडून येत्या 10 सप्टेंबर पासून शहरातील मोकाट डुकरे पकडण्यासाठी डुक्कर मुक्त मोहीम पुण्यात राबविण्यात येणार असल्याचे जाहीर प्रकटन महापालिकेकडून देण्यात आले आहे.
शहरातील मोकाट डुकरांची समस्या गंभीर झाली आहे, त्यामुळे महापालिकेच्या मुख्यसभेत नगरसेवकांकडून वारंवार याबाबत तक्रारी करण्यात येत आहेत. त्यामुळे पालिकेकडून डुक्करमुक्त मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा महापालिका आयुक्तांनी या पूर्वीच केली आहे. तसेच महापालिका हद्दीत डुक्कर पाळने हा अनधिकृत व्यावसाय असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पालिकेने या मोहीमेसाठी जय्यत तयारी केली आहे.

          त्या अंतर्गत पालिकेकडून नुकतेच एक जाहीर प्रकटन प्रसिध्दीस देण्यात आले असून त्यात महापालिका अधिनियम शेड्यूल चॅप्टर 14 (22) (3) मध्ये कोणतेही मोकाट डुक्कर शहरात भटकताना आढळल्यास त्यास ताबडतोप मारून टाकता येईल. आणि आयुक्त निर्देश देतील त्या प्रमाणे त्या डुकराच्या प्रेताची विल्हेवाट लावता येईल. आणि अशा रितीने मारून टाकलेल्या कोणत्याही डुकरा बद्दल भरपाई मिळविण्यासाठी कोणताही दावा करता येणार नाही. त्यामुळे भटक्‍या डुकरांचा व्यावसाय करणाऱ्यांनी भटकी व मोकाट डुकरे त्वरीत महापालिका हद्दीबाहेर हलविण्यात यावी अन्यथा वरील प्रमाणे कारवाई केली जाईल असे आदेश दिले आहेत.
———-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
56 :thumbsup:
7 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
4 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)