आयुक्तांचे आदेश वाऱ्यावर

चौकाचौकांत जाहिरातींना उत : क्षेत्रिय कार्यालयांकडे कारवाईस वेळ नाही

पुणे – महापालिका आयुक्तांनी शहरातील अनधिकृत बोर्ड, बॅनर्स तसेच फ्लेक्‍स लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन 2 दिवस झाले असतानाच प्रत्येक चौकात अशा जाहिरातींना उत आला आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या सलग सुट्ट्या लक्षात घेऊन हे जाहीरात फलक रातोरात उभारले जात आहेत.

-Ads-

शहरातील अनधिकृत जाहिरात प्रकरणी महापालिके विरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल झाली आहे. या याचिकेच्या अनुषंगाने अशा जाहीरातींवर कारवाई करून संबंधीत जाहिरातदारांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने, महापालिका आयुक्तांनी मागील आठवड्यात बैठक घेऊन ही कारवाईची जबाबदारी निश्‍चित करून देण्यात आलेल्या सहायक आयुक्त (क्षेत्रीय अधिकारी) यांना कारवाई अधिक तीव्र करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यात जे अधिकारी कारवाई करणार नाहीत त्यांची नावे थेट न्यायालयात दिली जातील तसेच, ज्या पोलीस ठाण्यातील अधिकारी महापालिकेच्या तक्रारीस प्रतिसाद देणार नाहीत, त्यांचीही नावे न्यायालयात द्यावीत अशा सूचना केल्या आहेत. तसेच प्रत्येक 15 दिवसाला आपल्या प्रभागात एकही अनधिकृत जाहिरात नसल्याचा लेखी अहवाल सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. असे असतानाच शहरातील प्रत्येक चौकांत अनधिकृत फ्लेक्‍सचे प्रमाण लक्षणीय रित्या वाढले आहे. या जाहीराती प्रत्येक चौकांत आहेत. त्यामुळे एका बाजूला महापालिका स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत शहरात दंडात्मक कारवाई करून नागरिकांना शिस्तीचे धडे देत असतानाच दुसऱ्या बाजूला मात्र शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी न्यायालयाने सूचना देऊनही क्षेत्रीय कार्यालयांना वेळ मिळत नसल्याचे चित्र आहे.

कारवाईचे आकडे खोटे
शहरात अनेक चौकांत एका आठवड्यापेक्षा जास्त कालावधीत जाहिरत फ्लेक्‍स आहेत. असे असतानाच दुसऱ्या बाजूला महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून मात्र आयुक्तांना कारवाईचे खोटे आकडे सादर केले जात असल्याचे चित्र आहे. मात्र, कारवाई होत असेल तर काही फ्लेक्‍स महिनाभर का काढले जात नाहीत याचे कोणतेही उत्तर महापालिका प्रशासनाकडे नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)