‘आयुका’ नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. के. कस्तुरीरंगन

पुणे – “आयुका’ अर्थात “इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अॅन्ड अॅस्ट्रोफिजिक्‍स’ नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन यांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्ष डॉ. डी. पी. सिंह यांनी आज दिली.

“टिचर लर्निंग सेंटर’ (टीएलसी) “आयुका’त येत्या वर्षभरात उभारण्यात येणार आहे. या सेंटरचे भूमिपूजन डॉ. सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी यूजीसीचे माजी अध्यक्ष चौहान, आयुकाचे संचालक डॉ. शोमक रायचौधरी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, सेंटरचे प्रमुख डी. जी. सायकिया, शास्त्रज्ञ संजीत मित्रा उपस्थित होते. या सेंटरच्या माध्यमातून कॉलेजांमधील प्राध्यापकांना खगोलशास्त्राबाबत प्रशिक्षण देण्यात येणार असून, या प्राध्यापकांनी त्याचे शिक्षण विद्यार्थ्यांना देणे अपेक्षित आहे. यासोबतच देशात उपलब्ध असणाऱ्या खगोलशास्त्राशी निगडीत असणाऱ्या “आयुका’सारख्या संस्थांमध्ये काम करण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. तर, खगोलशास्त्राचे प्रात्याक्षिकांवर आधारित अभ्यासक्रम तयार करण्याच काम करण्यात येणार आहे.

डॉ. सिंह म्हणाले, “केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि टिचर्स रिसोर्स सेंटरच्या माध्यमातून हे सेंटर उभारण्यात येत आहे. शिक्षका-प्राध्यापकांना माहिती तंत्रज्ञानाचे कौशल्यपूर्ण प्रशिक्षण मिळावे आणि यांना खगोलशास्त्रासोबतच खगोलभौतिकी विषयाचे प्रशिक्षण घेता येण्यासाठी सेंटरचा फायदा होणार आहे. शिक्षक-प्राध्यापकांनी या प्रशिक्षणाचा फायदा त्यांच्या विद्यार्थ्यांना करुन द्यायचा आहे. त्यामुळे आगामी काळात हे केंद्र प्रमुख भूमिका बजावणार आहे. पारंपरिक अभ्यासक्रम आणि खगोलशास्त्रामध्ये सांगड घालण्यासाठी हे सेंटर मोलाची भूमिका पार पाडणार आहे,’ असे सिंह यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)