आयात शुल्क वाढीमुळे केंद्राचा महसूल वाढणार – हसमुख अढिया

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थसंकल्पात 45 वस्तूंवरील आयात शुल्कात वाढ करण्याची तरतूद आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी तिजोरीत 7 हजार कोटी रुपयांचे उत्पन्न अधिक मिळणार आहे. देशातील लघुद्योग क्षेत्राला याचा लाभ होणार आहे, असे अर्थ सचिव हसमुख अढिया यांनी सांगितले. सरकारने महसुलात वाढ होण्यासाठी हा निर्णय घेतला नाही. शुल्कात वाढ करण्यात आलेल्या वस्तूंची आयात कमी प्रमाणात करण्यात येते.

देशातील उत्पादन वाढीसाठी चालना देण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला. देशातील इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन वाढीसाठी सरकार प्रयत्न करत आहे. यानुसार अंतिम उत्पादनावर आता करात वाढ करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील सुटे माल आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील सुटया उत्पादनांवर आयात आकारण्यात येणार आहे असे त्यांनी म्हटले. एलईडी टीव्ही, फळांचा ज्युस, पतंग, मेणबत्ती यासारख्या वस्तूंवरील आयात शुल्कात वाढ करण्यात आल्याने कोणताही परिणाम होणार नाही. समाजातील परवडणाऱ्या लोकांकडून या वस्तू खरेदी करण्यात येतात. आतापर्यंत कर आकारण्यात न आल्याने त्यांचे संरक्षण होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)