आयात महागल्याने कार कंपन्यांकडून दरवाढ चालूच 

नवी दिल्ली: ऑटो बाजारात कंपन्या आपल्या पातळीवर नव्याने अनेक बदल करत आहेत परंतु हा बदल उत्पादनातील बदला संदर्भात किंवा सादरीकरणा संदर्भात नसून हा बदल कारच्या किमतीत वाढ करण्याचा असल्याने ग्राहकांच्या नजरा उंचावल्या असल्याचे पाहावयास मिळत आहे. सध्या टोयोटा कारच्या किंमतीत 1 जानेवारीपासून वाढ करण्यात निर्णय कंपनीने घेतला असल्याची माहिती टोयोटाकडून देण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर्सच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण आणि त्याचा परिणाम कार उत्पादन क्षमतेवर होत असलेला ताण यामुळे अनेक समस्यांना ऑटो कंपन्या तोंड देत आहेत.अनेक पातळयावर सूक्ष्म परीक्षण करूनच कारच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. ग्राहकांवर अनावश्‍यक किमतीचा भार न देण्याचा कंपनीचा विचार होता परंतु बाजारातील वाढता दबाव आणि त्यातून करावी लागणारी कंपनीला कसरत यामुळेच किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)