आयसीसी पुरस्कार सोहळ्यात स्मृती मंधानाचा दबदबा

दुबई: भारतीय महिला संघाची प्रतिभावान उपकर्णधार स्मृती मंधाना यंदाच्या “आयसीसी वूमेन्स प्लेअर ऑफ द ईयर’ पुरस्काराची मानकरी ठरली आहे. त्याचबरोबर तिने “आयसीसी वूमेन्स ओडीआय प्लेअर ऑफ द ईयर’चा पुरस्कारदेखील मिळवला आहे.

डावखुरी महिला फलंदाज स्मृतीने “रॅचेल फ्लिंट अवॉर्ड’ म्हणजे वूमेन्स प्लेअर ऑफ द ईयर पुरस्कार मिळविणारी केवळ दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. 2018 च्या कॅलेंडर वर्षात मंधानाने एकदिवसीय सामन्यात 12 सामन्यात 66.90 च्या सरासरीने 669 धावा बनविल्या होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तर, 25 टी-20 सामन्यांमध्ये तिने 130 च्या स्ट्राईक रेटने 622 धावा बनविल्या आहेत. याच कामगिरीच्या बळावर तिला हा पुरस्कार देण्यात आला. याबाबत बोलताना मंधाना म्हणाली, तुमच्या चांगल्या कामगिरीसाठी जर असे पुरस्कार मिळाल्याने आणखी चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)