आयसीसी क्रमवारित विराट आणि बुमराह अव्वलस्थानी कायम 

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. कोहलीने 884 गुणांसह फलंदाजी क्रमवारीत पहिल्या तर उपकर्णधार रोहित शर्मा 842 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या दहा फलंदाजांमध्ये शिखर धवन 802 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
तर, गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह 797 गुणांसह पहिल्या तर फिरकीपटू कुलदीप यादव 700 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या स्थानी अफगाणिस्तानच्या राशिद खाने याने 788 गुणांसह बाजी मारली आहे. युजवेंद्र चहल पहिल्या दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्याच्या उंबरठ्यावर आहे. तो सध्या 11 व्या स्थानी आहे. भारतीय संघ क्रमवारीत 122 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. इंग्लंडने 127 गुणांसह पहिले स्थान राखले आहे.
इग्लंडला हे स्थान वाचवण्यासाठी श्रीलंकेविरुद्ध पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत विजय मिळवावा लागेल. जर इंग्लंडने ही मालिका गमावली तर भारताला नंबर वनचा ताज मिळू शकतो. भारत 21 ऑक्‍टोबरपासून वेस्टइंडिजविरुद्ध पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. दोन्ही संघ मालिकेतील सर्व सामने जिंकले तर त्यांना प्रत्येकी एका गुणाचा फायदा होईल आणि क्रमवारी क्रमवारी जैसे थे’ राहिल.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)