आयसीसी अंडर-19 विश्‍वचषक: भारताचे ऑस्ट्रेलिया समोर ३२९ धावांचे आव्हान

माऊंगानुई – आयसीसी अंडर-19 विश्‍वचषक स्पर्धेतील सलामीच्या लढतीत भारताने ऑस्ट्रेलिया समोर ३२९ धावांचे आव्हान ठेवले आहे. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय भारताचा कर्णधार पृथ्वी शॉ आणि मनज्योत कालरा या दोन्ही सलामीवीरांनी सार्थ ठरवला. या दोघांनी १८० धावांची भागीदारी केली. कर्णधार पृथ्वी शॉ याचं शतक अवघ्या ६ धावांनी हुकलं.

भारताने ५० षटकांमध्ये ७ गडी बाद ३२८ ही धावसंख्या उभारली आहे. अंडर-19 विश्‍वचषक स्पर्धेतील ही भारताची ऑस्ट्रेलिया विरुद्धची सर्वात मोठी धावसंख्या आहे. आता संपूर्ण मदार भारताच्या गोलंदाजांवर आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)