आयसीसीचा संघ जाहीर, भारतातील या खेळाडूंनी मिळविले स्थान

लंडन – आयसीसीने ‘चॅम्पियन्स ट्रॉफी 2017’ ची टीम जाहीर केली आहे. या संघाचे नेतृत्त्व पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदकडे देण्यात आले. संघात भारताच्या तीन खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. यामध्ये विराट कोहली, शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार यांचा समावेश आहे.

आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात पाकिस्तानच्या चार खेळाडूंना स्थान मिळालं आहे. फायनलमध्ये खणखणीत शतक ठोकणारा पाकिस्तानचा सलामीवीर फखर झमानने संघात एण्ट्री मिळवली आहे. झमानशिवाय आणखी तीन पाकिस्तानी खेळाडू या संघात आहेत. यामध्ये कर्णधार/विकेट किपर सरफराज अहमद, वेगवान गोलंदाज जुनैद खान आणि हसन अली यांचा समावेश आहे. याशिवाय इंग्लंडच्या तीन, बांगलादेश आणि न्यूझीलंडच्या एक-एक खेळाडूला संधी मिळाली आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी संघ: सरफराज अहमद (पाकिस्तान, कर्णधार/विकेटकीपर), शिखर धवन (भारत), फखर झमान (पाकिस्तान), तमीम इकबाल (बांगलादेश), विराट कोहली (भारत), ज्यो रूट (इंग्लंड), बेन स्टोक्‍स (इंग्लंड), आदील राशिद (इंग्लंड), जुनैद खान (पाकिस्तान), भुवनेश्वर कुमार (भारत), हसन अली (पाकिस्तान), केन विल्यमसन (12वा खेळाडू,न्यूझीलंड).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)