आयसीएसआयच्या अध्यक्षपदी लेले

पुणे – इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडीयाचे (आयसीएसआय) फेलो सदस्य सीएस मकरंद लेले यांची सन 2018 साठी आयसीएसआय संस्थेच्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली, अशी माहिती प्रिती बॅनर्जी यांनी दिली आहे.

लेले हे आयसीएसआयचे सन 1992 पासुन सदस्य आहेत तसेच 1993 पासुन व्यावसायिक कंपनी सचिव म्हणुन पुणे शहरात कार्यरत आहेत. त्यांनी 2003 मध्ये आयसीएसआयच्या पुणे शाखेचे अध्यक्षपद भुषविले असुन त्यांच्या या कार्यकाळात शाखेला उत्कृष्ठ शाखेचा पुरस्कार मिळाला असल्याचेही बॅनर्जी यांनी सांगीतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)