आयसीआयसीआय बॅंकेच्या अध्यक्षपदी गिरीशचंद्र चतुर्वेदी

नवी दिल्ली, आयसीआयसीआय बॅंकेने भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त अधिकारी गिरीशचंद्र चतुर्वेदी यांची आयसीआयसीआय बॅंकेचे बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून तीन वर्षांकरता नियुक्‍ती केली आहे. बॅंकेत सध्या फार मोठ्या नकारात्मक घडामोडी घडलेल्या नाहीत. ज्या काही किरकोळ बाबी झाल्या आहेत. त्या सोडविल्या जातील. तसेच अशा चुका पुन्हा होऊ दिल्या जाणार नसल्याचे चतुर्वेदी यांनी सांगितले आहे. आपण रूजू झाल्यानंतर प्राधान्यक्रम ठरविणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी याअगोदर काही सरकारी बॅंकांच्या संचालक मंडळावर काम केले आहे. ते 2011 मध्ये भारतीय प्रशासन सेवेतून निवृत्त झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)