आयसीआयसीआय बॅंकेच्या अधिकाऱ्यांची सीबीआयकडून चौकशी

व्हिडीओकॉन कर्ज प्रकरण : गरज भासल्यास चंदा कोचर आणि त्यांच्या पतीलाही समन्स
नवी दिल्ली – व्हिडीओकॉन समुहाला देण्यात आलेल्या कर्जावरून संशयाचे धुके निर्माण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर सीबीआयने आयसीआयसीआय बॅंकेच्या काही अधिकाऱ्यांची चौकशी केली. या प्रकरणी गरज भासल्यास बॅंकेच्या सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दिपक कोचर यांनाही चौकशीसाठी समन्स बजावले जाण्याची शक्‍यता सीबीआयकडून वर्तवण्यात आली.

व्हिडीओकॉनला 2012 मध्ये आयसीआयसीआय बॅंकेने 3 हजार 250 कोटी रूपये कर्ज दिले. व्हिडीओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत आणि दिपक कोचर यांच्यातील व्यावसायिक संबंधांमुळे संबंधित कर्ज मंजूर झाल्याचा संशय वर्तवणारे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले. त्यामुळे हे कर्ज प्रकरण चौकशीच्या घेऱ्यात आले आहे. सीबीआयने याप्रकरणी प्राथमिक चौकशी (पीई) सुरू केली आहे.

पीईमध्ये धूूत आणि दीपक कोचर यांच्या नावांचा समावेश आहे. व्हिडीओकॉनला कर्ज देण्याच्या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या आयसीआयसीआय बॅंकेच्या काही अधिकाऱ्यांचे जबाब सीबीआयने नोंदवून घेतले. कर्जाशी संबंधित कागदपत्रांची छाननी केली जात आहे. त्यात काही गैर आढळल्यास कोचर दाम्पत्याला चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्‍यता सीबीआय अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात आली. दरम्यान, आयसीआयसीआय बॅंकेच्या संचालक मंडळाने याआधीच चंदा कोचर यांच्यावर पूर्ण विश्‍वास असल्याचे म्हणत त्यांना एकप्रकारे क्‍लीन चिट दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)