आयबॉलचा नवा लॅपटॉप लॉंच

मुंबई: बजेट स्मार्टफोनप्रमाणेच आता बजेट लॅपटॉपही बाजारात येत आहेत. असाच एक नवा बजेट लॅपटॉप आयबॉलने लॉंच केला आहे. आयबॉल कॉम्पबुक मार्वल 6 लॅपटॉपची किंमत 14,299 रुपये आहे. या लॅपटॉपची स्क्रीन 14 इंच असून यामध्ये विंडोज 10 ओएस देण्यात आला आहे. तसेच या लॅपटॉपमध्ये इंटेलचा सेलेरॉन एन3350 प्रोसेसर आहे. ज्याचा स्पीड 2.4 गीगाहर्त्झ आहे. यामध्ये 3 जीबी रॅम आहे. आयबॉलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक संदीप पराश्रमपुरिया यांनी याविषयी माहिती दिली. हाय परफॉर्मन्ससाठी मार्वल लॅपटॉप तयार करण्यात आला आहे. आम्हाला विश्वास आहे की, प्रत्येक बिजनेस फर्मसाठी हा लॅपटॉप उपयुक्त ठरणार असल्याचेही पराश्रमपुरिया यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)