आयपीसी परीक्षेचा निकाल जाहीर

 

पुणे – चार्टर्ड अकाउंटंटस्‌ इंटरमिडिएट अर्थात आयपीसी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेचा एकूण निकाल 26.72 टक्‍के लागला आहे. या परीक्षेत अहमदाबादचा जय सेठ हा विद्यार्थी देशात प्रथम आला आहे. मुंबईची सिमरण केस्सार ही राज्यात प्रथम आली असून, ती देशात तृतीय क्रमांक मिळविली आहे.

दि चार्टर्ड अकाउंटंटस्‌ ऑफ इंडियातर्फे आयपीसी परीक्षा नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आली होती. या परीक्षेतील ग्रुप एकचा निकाल 13.92 टक्‍के लागला आहे. ग्रुप एकमधून देशात 72 हजार 148 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 10 हजार 42 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याचप्रमाणे ग्रुप दोनमधून 65 हजार 393 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 13 हजार 330 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याची टक्‍केवारी 20. 38 आहे. दोन्ही ग्रुपमधून 49 हजार 215 विद्यार्थी परीक्षा बसले. त्यापैकी 13 हजार 149 विद्यार्थी उत्तीर्ण ठरले आहेत. त्याची एकूण टक्‍केवारी 26.72 आहे.

देशात जय सेठ हा 75.71 टक्‍के गुण मिळवून देशात पहिला, तर कोलकताचा सुसर्ला जयराम हा 74.15 टक्‍के मिळवून द्वितीय क्रमांक आला आहे. देशात सिमरन केस्सार ही 74.43 टक्‍के मिळवून देशात तिसरी आली आहे, तर राज्यात प्रथम क्रमांकांनी उत्तीर्ण झाली आहे.

निकाल टक्‍केवारी
ग्रुप 1 – 13.92
ग्रुप 2 – 20.38
दोन्ही ग्रुप – 26.72

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)