आयपीओ जाहीर होण्याच्या आधीचे ‘छुपे रुस्तम’ (भाग-१)

Health is Wealth !  But being wealthy is also feeling healthy. इथं wealthier हा शब्द सक्षम या अनुषंगानं वापरला आहे. वेल्थ या शब्दाचा अर्थ होतो संपत्ती अथवा मौल्यवान गोष्टींची उदंडता. अर्थात अशी संपत्ती ही काही एका दिवसात बनत नसते तर त्यासाठी गुंतवणुकीची तयारी, संयम व अचूक मार्ग यांची योग्यप्रकारे सांगड घालणं गरजेचं असतं. आणि जर अशी संपत्ती एका रात्रीतच उभी राहिली तर एकतर त्यास संपत्ती न म्हणता लॉटरी अथवा धनलाभ म्हटलं जातं नाहीतर त्याची किंमत तरी रहात नाही. याउलट अशी संपत्ती ही योग्य मार्गानं जमवली असली तर त्याचं कौतुक राहतं.

मागील महिन्यांत आपण वेल्थ क्रिएशन, वेल्थ मॅनेजमेंट इ. संज्ञांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तसंच वेळोवेळी त्या अनुषंगानं अनेक प्रकारे विविध गुणवान कंपन्यांची यादी देखील देऊन झालीय की ज्यांच्या शेअर्समध्ये योग्य भावात गुंतवणूक करून त्यांद्वारे येणाऱ्या दशकांमध्ये आपण वेल्थ क्रिएशनची अपेक्षा ठेऊ शकतो.

बरेचदा आपण असं अनुभवतो की कांही उत्तम कंपन्या ज्या आपल्या सर्वांच्या परिचित असतात, त्यांचे आयपीओ हे मोठ्या संख्येनं ओव्हर सबस्क्राईब (अनेकपट प्रतिसाद मिळणं) होतात व त्याकारणानं त्यांची शेअर बाजारातील नोंदणी (लिस्टिंग) देखील धमाकेदार होती. त्यामुळं बरेचदा असं होतं की ज्यांना आयपीओमध्ये शेअर्स मिळत नाहीत ते अशा फायद्याला हात धुवून बसतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर डीमार्टचं घेता येईल; २९९ रुपयांना आलेल्या आयपीओद्वारे फार कमी लोकांना शेअर्स मिळाले व त्या शेअर्सची नोंदणी ही दुप्पट भावात म्हणजे ६०० रुपयांना झाली व आज त्याचा भाव १४०० रुपयांच्या घरात आहे. आता हे टाळण्यासाठी काय करायचं ? कारण अशा संधी दवडणं म्हणजे लागलेल्या लॉटरीचं तिकीट हरवण्यासारखं आहे. तर मग अशा गोष्टी टाळण्यासाठी अशा निवडक कंपन्यांचे शेअर्स त्या कंपन्यांचे आयपीओ जाहीर होण्याच्या आधीच खरेदी करून ठेवायचे. होय, अशा प्रकारे हे शेअर्स आपण खरेदी करू शकतो व ते अगदी कायदेशीर देखील आहे. असे शेअर्स आर्थिक सल्लागारांकडं किंवा ब्रोकर्सकडं उपलब्ध असू शकतात; फक्त ब्रोकर किंवा तुमचा सल्लागार हा विश्वासू असावा कारण येथे सर्वसाधारणपणे असे शेअर्स खरेदी करण्यासाठी संबंधीत रक्कम ही चेक अथवा ऑनलाईन पद्धतीनं आगाऊ जमा करावी लागते व त्यानंतर साधारणपणे २ दिवसांत (T+२) ते शेअर्स आपल्या डी-मॅट खात्यात जमा होतात. अशा अनलिस्टेड शेअर्सच्या व्यवहारांबद्दल सविस्तर अशी माहिती आधीच्या कांही लेखांमधून दिलेलीच आहे.

आयपीओ जाहीर होण्याच्या आधीचे ‘छुपे रुस्तम’ (भाग-२)

खालील तक्त्यात अशाच काही वेल्थ क्रिएटर कंपन्यांची उदाहरणं देत आहे ज्यांतून मागील काहीच वर्षांत गुंतवणूकदारांनी आपली संपत्ती बनवली आहे.

– एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेस ही कंपनी अजून लिस्ट होण्याआधीच उत्तम परतावा दिल्यानं ती नमूद केलेली आहे.

आयपीओ जाहीर होण्याच्या आधीचे ‘छुपे रुस्तम’ (भाग-२)

या तक्त्यावरून लक्षात येऊ शकते की, या कंपन्यांनी मागील दोन-तीन वर्षांतच जवळ-जवळ पाचपट परतावा दिलेला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)