आयपीओद्वारे निधी उभारणीत 53 टक्क्यांनी घट

चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत आयपीद्वारे निधी उभारण्यात 53 टक्क्यांनी घट झाली आहे. या सहा महिन्याच्या काऴात 10 कंपन्यांनी आयपीओद्वारे 12,470 कोटी रुपये उभे केले आहेत. गेल्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या काळात आयपीओद्वारे 19 कंपन्यांनी तब्बल 26,720 कोटी रुपये उभे केले होते.

दुसऱ्या सहामाहीत देखील आयपीओद्वारे निधी उभारणीत घट होईल असा तज्ञांचा अंदाज आहे. शेअर बाजारातील घसरण आणि अस्थिर वातावरण तसेच कच्च्या तेलाच्या किंमती, रुपयाची घसरण आणि अमेरिका-चीन यांच्यातील या सगळ्यांचा परिणाम आयपीओवर झाला आहे. मात्र आयपीओ बाजारातील चिंता वाढवून सांगितल्या जात असून येत्या काळात आयपीओ निधी उभारणीसाठी उत्साही वातावरण असेल असेही सांगितले जाते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एप्रिल ते सप्टेंबर 2017 या काळातील आयपीओमध्ये आयसीआयसीआय लोम्बार्ड (5,700 कोटी रुपये) आणि एसबीआय लाईफ इन्शुरन्स (8,400 कोटी रुपये) यांनी उभी केलेली एकत्रित रक्कम लक्षात घेतली तर ती 13,700 कोटी रुपये होते. या दोन कंपन्यांचाच आयपीओ मार्केटमधील हिस्सा मोठा होता. त्यांना वगळले तर एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीतील आयपीओ बाजारातील चित्र फार निराशाजनक नाही, असे अभ्यासकांचे मत आहे. दिवाळीनंतर आणि जानेवारीमध्ये आयपीओ मार्केटमध्ये तेजी आली नाही तर मग लोकसभा निवडणुका संपेपर्यंत फारसे आशादायक चित्र असण्याची शक्यता नाही.

– चतुर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)