आयपीएल बेटिंग प्रकरणात सलीम खान?

बुकी सोनू जलान याची पोलीस चौकशीत धक्‍कादायक माहिती
मुंबई – आयपीएल बेटिंग प्रकरणात अभिनेता अरबाज खान नंतर आता त्याचे वडील सलीम खान यांचेही नाव समोर आले आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या बुकी सोन जलाल याने पोलीस चौकशीत ही धक्‍कादायक माहिती दिली आहे. सलीन खान पूर्वी सट्टा लावत होते. मात्र, आता ते सट्टा लावतात की नाही हे माहित नसल्याचे त्याने म्हटले आहे. यामुळे सलीन खान अडचणीत येण्याची शक्‍यता आहे.

आयपीएल सामन्यांवर सट्टा लावल्याची कबुली अभिनेता अरबाज खान याने काही दिवसांपूर्वीच दिली आहे. गेल्या पाच वर्षांपासून अरबाज बुकी सोनू जलानच्या संपर्कात होता. आंतरराष्ट्रीय सामन्यांवर आपण आतापर्यंत सट्टा लावला असून बेटिंगमध्ये काही वेळा जिंकल्याचीही कबुली अरबाजने दिली. मात्र आपल्या कुटुंबाला सट्टा लावणे पसंत नसल्याने आपण बेटिंगमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र बुकी सोनू जलान याने जुनी रेकॉर्डिंग्स ऐकवून ब्लॅकमेल करत दबाव आणला, असा दावा अरबाजने केला आहे. त्यामुळे अरबाजला बेटिंग प्रकरणात पोलिसांनी मुख्य साक्षीदार केले आहे.

ठाणे खंडणीविरोधी पथकाने काही दिवसांपूर्वी आयपीएल सामन्यांवर सुरु असलेले ऑनलाईन बेटिंगचे रॅकेट उघड करत डोंबिवलीतून तिघांना अटक केली होती. त्यानंतर या तिघांच्या चौकशीत हे रॅकेट देशातला आघाडीचा बुकी सोनू जालान उर्फ सोनू मालाड चालवत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी सोनूला बेड्या ठोकल्या.

सोनूच्या चौकशीत अभिनेता अरबाज खान हा देखील सोनूकडे बेटिंग करत असल्याची माहिती समोर आली. यानंतर पोलिसांनी अरबाज खानला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते.

दरम्यान, सोनूच्या संपर्कात देशातले 80 ते 90 बडे बुकी आणि अनेक सेलिब्रेटी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे लवकरच खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात बड्या असामींची हजेरी लागण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)