आयपीएल जिंकणाऱ्या संघाला मिळणार ‘हे’ बक्षीस

मुंबई : आयपीएलच्या ११ व्या मोसमाच्या स्पर्धेचा आज शेवटचा सामना आहे. या सामन्यात चेन्नई आणि हैदराबाद हे दोन संघ एकमेकांशी भिडत आहेत. चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.  हे दोनही संघ विजय मिळवण्याच्या त्वेषाने मैदानावर उतरले आहेत. यातील विजयी संघाला आयपीएलचे विजेतेपद आणि ट्रॉफी तर मिळणार आहेच. पण त्या बरोबरच आणखीही काही मिळणार आहे. फक्त विजेत्या संघालाच नव्हे, तर उपविजेत्या संघाला आणि इतर विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही गौरवण्यात येणार आहे.

* विजेता संघ – २० कोटी आणि ट्रॉफी : आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला २० कोटींचा धनादेश आणि आयपीएलची ट्रॉफी मिळणार आहे. संघाचा कर्णधार हा धनादेश व ट्रॉफी संघाच्या खेळाडूंच्या आणि व्यवस्थापन टीमच्या वतीने स्वीकारेल. याशिवाय, विजेत्या संघाच्या प्रत्येक खेळाडूला सन्मानचिन्ह दिले जाणार आहे.

* उपविजेता संघ – १२.५ कोटी : अंतिम फेरीत विजेत्या संघापेक्षा कुठेतरी थोडासा कमी पडलेला असा उपविजेता संघ असतो. त्यामुळे उपविजेत्यालादेखील बक्षीस दिले जाते. या स्पर्धेत उपविजेत्या संघाला १२. ५ कोटी रुपयांचा धनादेश बक्षीस म्हणून दिला जाणार आहे. संघाचा कर्णधार हा धनादेश संघाच्या खेळाडूंच्या आणि व्यवस्थापन टीमच्या वतीने स्वीकारेल.

* ऑरेंज कॅप – १० लाख आणि ट्रॉफी : हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ही कॅप आणि बक्षीस प्रदान केले जाते. या कॅपच्या मानकऱ्याला १० लाख रुपये आणि ट्रॉफी दिली जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
21 :thumbsup:
3 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
4 :cry:
10 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)