आयपीएल क्रिकेट बेटिंगचा कोल्हापुरात पर्दाफाश; २७ जणांना अटक

कोल्हापूर – कोल्हापूर शहरातील शाहूपुरी सहावी गल्ली येथील दशरथ अपार्टमेंटमधील एका फ्लॅटवर व राजाराम रोडवरील कमलकृष्ण कॉम्प्लेक्सच्या गाळ्यातील बुकीवर छापा टाकून पोलिसांनी आयपीएल क्रिकेट सामना बेटिंग रॅकेटचापर्दाफाश केला.या प्रकरणी क्रिकेट बेटिंगच्या मालकासह २७ जणांना अटक केली असून, तीन लाख ४० हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली. याची नोंद शाहूपुरी पोलिसांत झाली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, डेअरडेव्हिल्स दिल्ली व किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील टी-२० सामन्यादरम्यान शाहूपुरी सहावी गल्ली येथील दशरथ अपार्टमेंटमध्ये दशरथ निवृत्ती निकम यांच्या फ्लॅटमध्ये सोमवारी (दि. २३) रात्री छापा टाकला. या छाप्यात ३० हजार ३९० रुपये, मोबाईल, लॅपटॉप, दूरचित्रवाणी संच व जुगाराचे आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या असे दोन लाख ८७ हजार ३९० रुपये असा एकूण तीन लाख १७ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. या प्रकरणी संशयित अस्लम अक्सरअली कांडगावे, उमेश रमेश गोंजारे (रा. शाहूपुरी सहावी गल्ली), नीलेश शंकर परदेशी, विक्रम पोपट गायकवाड (रा. जुना बुधवार पेठ)

निशिकांत दत्तात्रय कनवाडे (शाहूपुरी सातवी गल्ली), संतोष भालचंद्र पेंडूरकर (तेली गल्ली, पापाची तिकटी), रोहित प्रदीप बनसोडे, हरिहर शिवदत्त सावंत, विकी सुरेंद्र बनसोडे, अनिकेत आनंदराव निंबाळकर, सागर बाबूराव पाटील, इम्रान आदम जमादार, राहुल चंद्रकांत बन्ने (शाहूपुरी पाचवी गल्ली), प्रवीण शामराव महापुरे (रा. राजारामपुरी चौथी गल्ली), अमित कौतुक राणे, नितीन सुभाष पाटील (मंगळवार पेठ), महेंद्र बाबूराव दामुगडे (१६, ई वॉर्ड, कदमवाडी), सुनील भिकाजी घाटगे (बोर तालमीजवळ, लक्षतीर्थ वसाहत), सुदर्शन पांडुरंग किरूळकर (रा. ११९१, ए वॉर्ड, राजाराम रोड), ओंकार महादेव चौगुले, प्रकाश दुडाप्पा गुडसे (रा. डफळे कॉलनी, उचगाव )

विकास संभाजी पाटील (रा. ८७६, ए वॉर्ड, शिवाजी पेठ) व क्रिकेट बेटिंगचा मालक गणेश योगेश काटे (रा. शाहूपुरी पाचवी गल्ली) यांना अटक केली. संशयित सनी ऊर्फ मिलिंद मोहन जाधव (रा. शाहूपुरी, कोल्हापूर) याचा शोध पोलीस घेत आहेत. तो किंग्ज ११ पंजाब विरुद्ध दिल्ली डेअर डेव्हिल्स या सामन्याचे बेटिंग (सट्टा) घेऊन विविध इसमांची फसवणूक करीत असल्याचे निष्पन्न झाले.

दुसरीकडे, राजाराम रोडवरील कमलकृष्ण कॉम्प्लेक्समधील गाळा नंबर पाचमध्ये टी-२० किंग्ज पंजाब विरुद्ध दिल्ली डेअर डेव्हिल्स यांच्यातील टी-२० क्रिकेट सामन्यावर सट्टा स्वीकारत होते. त्यामध्ये २३ हजार १०० रुपयांच्या साहित्यासह मिळून आले.या प्रकरणी संशयित अमोल गणपती पोतदार (रा. १६६२, बी वॉर्ड, खरी कॉर्नर), वाशिम युनूस खली रोहित रवींद्र मोरे (रा. जुना बुधवार पेठ) व उत्तम रमेश गोंजारे (रा. शाहू मिल, कामगार भवनशेजारी, राजारामपुरी) यांना अटक करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)