आयपीएलसाठी महेंद्र सिंह धोनी करतोय परिश्रम

मुंबई : इंडियन प्रिमियर लीग च्या ११ व्या मोसमाला सुरूवात होण्यासाठी आता काहीच दिवस उरले आहेत. येत्या ७ एप्रिलपासून देशभरात आणि जगभरातील क्रिकेट प्रेमींना आयपीएलचा थरार पहायला मिळेल.  दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज दोन वर्षानंतर पुन्हा पुनरागमन करत आहे. या टीमचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी सध्या जोरदार मेहनत घेताना दिसत आहे. आयपीएल पर्वाला सामोरे जाण्यासाठी धोनी कसे परिश्रम घेत आहे याबाबतचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जची कमान पुन्हा एकदा महेंद्र सिंह धोनीच्या हातात असणार आहेत.

धोनीच्या फलंदाजीची काही विशेष वैशिष्ट्ये आहेत. या वैशिष्ट्यांच्या जोरावर धोनी आपली खेळी मैदानात दाखवत असतो. अनेकदा या खेळीमुळे संघाला विजयही मिळत असतो. पण, त्यामागे धोनीचे कष्टही असतात. या व्हिडिओतही धोनीचे परिश्रम दिसतात. व्हिडिओत धोनी एकूण तीन चोंडू मारताना दिसतो आहे. त्यात पहिले दोन चेंडू त्यांनी अत्यंत अरामात आणि एका हातात बॅट पकडून मारले आहेत. पण, तिसरा चेंडू मात्र धोनीच्या फलंदाजीचे दर्शन घडवताना दिसतो. अखेरचा चेंडू धोनीने एका मजबूत फटक्याच्या रूपात टोलावला आहे. तुम्हीही या व्हिडिओची मजा घेऊ शकता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)