आयपीएलमध्ये पंजाब जिंकल्यास..!

‘आयपीएल’चा धमाका सुरू झाला आहे. प्रिती झिंटा मालकीण असलेल्या पंजाब किंग्ज इलेव्हन संघाने आतापर्यंत एकदाही “आयपीएल’ टुर्नामेंट जिंकलेली नाही. याचे शल्य प्रितीला फार लागून राहिलेले आहे. यंदाच्या सिझनमध्ये पंजाबचा संघ भलताच फॉर्मात आहे. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये पंजाबची कामगिरी चांगली झाली आहे. आपल्या संघाला चिअर अप करण्यासाठी स्वतः प्रिती झिंटा प्रत्येकवेळेस स्टेडियममध्ये उपस्थित असल्याचे दिसते आहे.

नुकतेच एका सामन्यानंतर प्रिती आपल्या टीममधील के.एल. राहुलबरोबर बोलत होती. शाहरुखने त्याची कोलकाताची टीम जिंकल्यावर “कार्टव्हिल’ केले होते. पण प्रितीने तसे काय ठरवले आहे, असे राहुलने तिला विचारले. त्यावर आपली टीम जिंकल्यावर काही खास करणार आहे. मात्र त्याबाबत आताच काहीही सांगणार नाही. असे प्रितीने सांगितले.
प्रितीने हेच आश्‍वासन ख्रिस गेललाही दिले असल्याचे समजते आहे.

ख्रिस गेल हा पंजाबचा तुफानी बॅट्‌समन आहे. त्याच्या स्कोअरवर तर पंजाबची मदार असते. त्याच्या हातातच पंजाबला विजय मिळवून देण्याची क्षमता असते. त्याच्यासाठी काही तरी खास म्हणजेच नक्की काही तरी खास असणार. या “आयपीएल’ सिझन दरम्यान प्रिती आणि ख्रिस गेल यांच्यातच काही सेटिंग होत असल्याची चर्चा आता रंगायला लागली आहे.

यापूर्वी प्रितीचे नाव आणि नेस वाडिया, मोहित बर्मन आणि अन्य काही जणांबरोबर जोडले गेले होते. 2008 मध्ये तिने “आयपीएल’साठी पंजाबची फ्रॅंचाईजी विकत घेतली. त्यानंतर प्रितीने अमेरिकन दोस्त जीन गुडइनेफबरोबर लग्न केले. तिने दक्षिण आफ्रिकेतील ग्लोबल टी – 20 लीगमध्ये स्टेलेनबोश नावाच्या टीमचीही फ्रॅंचाईजी घेतली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)