आयपीएलच्या अखेरच्या सत्रात ऑस्ट्रेलियन खेळाडू खेळणार नाहीत- ऑस्ट्रेलिया 

सिडनी: विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा आणि आयपीएल स्पर्धा दोन्ही स्पर्धांमधिल अंतर कमी असल्याने आयपीएल मध्ये विदेशी खेळाडूंच्या सहभागाबद्दल सुरु असलेल्या चर्चांमध्ये न्युझीलंडचे खेळाडू संपुर्ण हंगामासाठी उपलब्ध असल्याचे त्यांच्या क्रिकेट बोर्डाने जाहिर केल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहिर केलेल्या निवेदनात त्यांनी आयपीएलमध्ये खेळाडूंच्या सहभागा साठी अनेक अटी लादल्याचे समोर आले आहे.

2019 साली होणाऱ्या आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डाने आपल्या खेळाडूंसमोर अनेक अटी ठेवल्या आहेत. त्यातच विश्‍वचषक स्पर्धेमुळे यंदाच्या आयपीएलच्या मोसमाची सुरूवात नेहमी पेक्षा लवकर 29 मार्चपासून सुरु करण्यात येणार आहे. यावेळी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने ठेवलेल्या अटीम्मध्ये नमूद केले आहे की, ज्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळायचे आहे, त्यांनी आपल्या स्थानिक संघाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवणे गरजेचे आहे. कारण, विश्‍वचषक स्पर्धेमुळे यंदाच्या आयपीएलचे आयोजन नेहमीपेक्षा आधी होत असल्याने आयोजनाच्या दृष्टीने हा थोडा कठीण काळ असणार आहे. यामुळे आमच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धांवरही याचा परिणाम जाणवनार आहे. आम्ही आयपीएलमध्ये खेळण्यासाठी सरसकट परवानगी देत नाही, प्रत्येक खेळाडूच्या अर्जावर वेगळा विचार केला जातो. त्यामुळे भविष्यकाळात गैरसमज टाळण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ही भूमिका घेतली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्‍लार्क यांनी असोसिएट प्रेसशी बोलताना ही माहिती दिली.

यावेळी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार, शेफिल्ड शिल्ड स्पर्धेच्या अंतिम फेरीनंतरच खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली जाणार आहे. याचसोबत आगामी विश्‍वचषक व इंग्लंडविरुद्ध ऍशेस मालिकेसाठी गरज पडल्यास खेळाडूंना ऑस्ट्रेलियामध्ये परतावे लागणार आहे. 23 एप्रिल रोजी ऑस्ट्रेलियाच्या विश्‍वचषक संघाची घोषणा करण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ विश्‍वचषकाचा माजी विजेता आहे, त्यामुळे आगामी विश्‍वचषकात ऑस्ट्रेलियाचा संघ कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. त्यामुळे संघामधिल निवडल्या गेलेल्या खेळाडूंना वापस मायदेशी परतावे लागणार आहे. त्यामुळे कदाचीत ते आयपीएलच्या हंगामातील अखेरच्या काही सामन्यांसाठी अनुपस्थित असतील. म्हणजेच आयपीएलच्या शेवटच्या दोन ते तीन अठवड्यांसाठी हे खेळाडू त्यांच्या संघांमध्ये सहभागी नसणार आहेत. यावर अद्याप आयपीएल मधिल संघव्यवस्थापनांकडून कोणतीही प्रतिक्रीया मिलालेली नाही. मात्र, जर यंदाच्या मोसमात दक्षिण अफ्रीका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या देशांमधिल लोकप्रीय खेळाडू आयपीएलमध्ये खेलणार नसतील तर त्याचा परिणाम नक्‍कीच यंदाच्या आयपीएलमध्ये जाणवणार आहे.

यावेळी विश्‍वचषक स्पर्धेचे महत्व लक्षात घेता क्रिकेट ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने आपले खेळाडू संपूर्ण हंगाम आयपीएल खेळणार नाहीत असे जाहीर केले होते. मात्र, जागतिक क्रिकेटमध्ये आयपीएलला असणारे महत्वाचे स्थान, लिलावातून खेळाडूंना मिळणारे पैसे यामुळे अनेक परदेशी खेळाडू स्थानिक क्रिकेटला बगल देत आयपीएल खेळणे पसंत करतात. यासाठी आगामी आयपीएलमध्ये सहभागी व्हायचे असल्याच क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डाने आपल्या खेळाडूंसमोर अश्‍या काही अटी ठेवल्या आहेत.

विश्‍वचषक स्पर्धा, आयपीएल आणि स्थानिक क्रिकेट स्पर्धांमधिल समतोल राखणे अवघड आहे मात्र आम्ही आमच्या परिणे आम्ही त्यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आता त्याच्या पुढील निर्णय आम्ही खेळाडूंवर सोडला असून त्यांनाच निर्णय घ्यायचा आहे की, त्यांच्या संघासाठी आणि त्यांच्या संघासाठी काय योग्य आहे. 

-क्रिकेट ऑस्ट्रेलिया 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)